अशा आहेत उपाययोजना
१. पशुधनास फ्रक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे,उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे.२. पशुधनाची वाहतुक फक्त सकाळी व संध्याकाळी करावी. दुपारी ११ ते ४ याजेपर्यंत वाहतुक करु नये.३. उन्हाळा संपेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये,४. पशुधनासाठी स्वच्छ व थंड पिण्याची पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद गोठ्याजवळ व सावलीत असावेत.५. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध करुन द्यावा,६. पशुपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा जास्तीत जास्त वापर करावा व गोठ्यात स्प्रिंकलर वापरावे.७. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतोदिवसा ११ ते ४ वाजेपर्यंत) वेळी विश्रांती द्यावी. बैलांना दुपारी कामास जुंपु नये.८. पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा/वैरण द्यावे.९. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलर / फॉगर ची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारावे तसेच शक्य असल्यास फॅन/कुलर लावावेत.१०. पशुखाद्य देतांना पुरेसेक्षार व जिवनसत्वे मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.११. पशुधनास उघड्यावर बांधु नये किंवा पार्क केलेल्या गाडीत सोडुन जाऊ नये.१२. पशुधनाची गर्दी करु नये व दाटीवाटीने बांधु नये. विरळ विरळ बांधावीत१३. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फ़ार दुर व फ़ार वेळ चालावे लागु नये याची दक्षता घ्यावी.१४. मुक्त संचार गोठा रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडुन अनुदानातुन अवलंब करण्यात यावा.१५. निकृष्ठ चा-याची पौष्टीकता वाढविण्यासाठी चा-यावर पशुवैद्यकांच्या सल्याने ३-५ टक्के युरीया व मोर्लेसेस प्रक्रिया करण्यात यावी१६. जनावरांना कडबा पेंडी ऐवजी चाफ कटर च्या सहाय्याने कुटटी करुन त्याचा वापर करावा, जेणेकरुन चारा वाया जाणार नाही१७. पावसाच्या पाण्याने भिजलेला चारा काळा पडल्यास / खराब झाल्यास त्यावर चुन्याची निवडी (१ किलो चुना २० लि पाणी/२०० किलो चारा टॉक्सीन बाईडर १ किलो/टन चा वापर करावा.१८. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत दुध उत्पादक पशुपालकांना पशुधन विषयक कर्ज मर्यादा १.६० लक्ष आहे. या योजनेमध्ये कर्जावरील व्याजदरामध्ये २ टक्के पर्यंत सवलत राहिल आहे. सदर योजना कोणत्याही पशुधन खरेदीसाठी नसुन त्यांच्या व्यवस्थापनावरील खर्चासाठी आहे.ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन पालकांसाठी प्रसारित करण्यात येत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377