पाचोरा, दि 20 – तालुक्यातील लोहटार येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप,हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे ६ यांच्या परिपत्रकानुसार केद्र शासनाच्या आदेशान्वये “हत्तीरोग दुरीकरण मोहीम २०२७” अंतर्गत मार्गदर्शक सुचनानुसार पोस्ट व्हॅलिडेशन सर्व्हेलन्स करीता लोहटार ता. पाचोरा जि. जळगांव या गावाची निवड करण्यात आली. मा.जिल्हा आरोग्य अधिकारीसो. डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या आदेशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.महेंद्र पाटील, तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड व तालुका आरोग्य सहाय्यक श्री. प्रल्हाद दामोदरे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक १६/१२/२०२४ ते दिनांक १९/१२/२०२४ रोजी रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान लोहटार गावात प्राथमिक आरोग्य केंद्र लोहटार ता.पाचोरा जि. जळगांव येथील तीन आरोग्य पथकाद्वारे रात्र रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली.
लोहटार गावातील एकुण घर संख्या ११५९ असुन गावांची लोकसख्या ४१२६ आहे. त्यापैकी दिनांक १६/१२/२०२४ ते १९/१२/२०२४ रोजी असे दरदिवशी १५० रात्री रक्त नमुना घेण्यात आले, असे एकुण ६०० रात्री रक्त नमुना सेन्टीनल व रॅडम पध्दतीने घेण्यात येवुन ते प्रयोगशाळा तपासणी करीता पाठविण्यात आलेले आहेत.
एंकदरीत गावांची लोकसंख्या पाहता गावात तीन भाग करण्यात आले व तीन पथकाद्वारे रात्री दहा वाजेपासुन ते बारा वाजेपर्यत रात्र रक्त नमुने संकलन करण्यात आले. अ टिममध्ये श्री. दिपक दिक्षित आरोग्य सहाय्यक, श्री प्रमोद पाटील आरोग्य सेवक, श्री. सुभाष फुफाटे आरोग्य सेवक, श्रीमती योगिता खैरनार आरोग्य सेविका व श्रीमती हर्षदा पाखले गटप्रर्वतक (ब) टिम मध्ये श्री . चितामण पाटील आरोग्य सहाय्यक, श्री अजय भागवत आरोग्य सेवक श्री गणेश पाटील आरोग्य सेवक श्रीमती वंदना महाजन आशा व श्रीमती वैशाली महाजन आशा ( क ) टिम मध्ये श्री. अतुल दाभाडे आरोग्य सहाय्यक वरखेडी श्री कमलेश्वर मोरे आरोग्य सेवक श्री. संदिप पाटील आरोग्य सेवक श्री. सर्वेश मदगे आरोग्य सेवक श्रीमती सुरेखा चौधरी आशा व श्रीमती माया पाटील आशा व प्रभात परदेशी हयांनी घरोघरी जावुन भेटी देवुन मोठया प्रमाणात. किटकजन्य आजार व ईतर आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. पवनकुमार पाटील व डॉ संदेश सोनवणे यांनी योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ग्रामपंचायतचे महीला लोकनियुक्त संरपंच विदया नाना पाटील, श्री. योगेश माळी,श्री.ज्ञानेश्वर वाघ ई.सदस्य व ग्रामस्थ या सर्वाचे अनमोज व उत्स्फुर्तपणे सहकार्य लाभले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377