31 डिसेंबरच्या दिवशी शेकडो तरुण माळकरी

पाचोरा दि.1– 31 डिसेंबर म्हटला म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी येणाऱ्या बातम्या म्हणजे मारहाण होणे दारू पिऊन लोक कुठेतरी पडून राहणे किंवा गुन्हेगारीच्या घटना घडणे किंवा तरुणांनी व्यसनाला सुरुवात करणे असा एकूणच उदमात करायचा दिवस असतो अनेक परिवारांमध्ये या दिवशी वाद होतात माणसे घरी दारू पिऊन व्यसन करून येऊन पत्नीला मारणे अनेक घरांमध्ये या दिवशी वाद ऐकायला येतात अनेक गावांमध्ये या दिवशी व्यसनाधीनतेवरून भांडणे झाली अशा बातम्या ऐकायला मिळतात परंतु यावर्षी एक पॉझिटिव्ह बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली ती म्हणजे 31 डिसेंबर या रोजी शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था अनाथालय पाचोरा चे संस्थाचालक योगेश महाराज धामणगावकर व सौ सुनीताताई पाटील या दोघांनी 31 डिसेंबरच्या दिवशी भागवत एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांसाठी व नुकतेच झालेल्या तरुण वारकरी मुलांसाठी भजनाचे व फराळाचे आयोजन केले व सदर कार्यक्रमात परिसरातील सर्व ज्येष्ठ वारकरी आणि तरुण मुलं यांना आमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाला आल्यानंतर उपस्थित तरुणांमध्ये शेकडो तरुणांनी आजच्या दिवशी गळ्यात तुळशी माळ घालून निर्व्यसनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला त्यात विशेष करून पुनगाव येथील मा सरपंच चिंतामण पाटील सह गावातील अनेक तरुणांनी वारकरी संप्रदाय ची तुळशीची माळ गळ्यात घालून योगेश महाराज यांचे कडून दीक्षा घेतली आदरणीय योगेश महाराज व पीएसआय योगेश गणगे यांनी दोघांनी केलेला संकल्प म्हणजे 1008 तरुण माळकरी करण्याचा संकल्प मध्ये दररोज एक नवीन उत्सवच परिसरातील तरुणांमध्ये जाणवत आहे आणि तरुण स्वतःहून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येऊन घड्यांमध्ये माळा घालून व्यसनमुक्त होण्याचा संकल्प घेत आहे तसेच परिसरातील मोंढाळे अंतुर्ली तसेच पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील सिंधी कॉलनी आणि शहरातील इतर भागातून अनेक तरुणांनी गळ्यात माळ घातली तसेच परिसरातील मांडकी गिरड वाघुलखेडा ,खळदेवळा इतर गावातील तरुणांनी सुद्धा माळ घालून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला
सदर कार्यक्रमाला परिसरातील जेष्ठ कीर्तनकार रवींद्र महाराज तारखेडे कर दगाजी महाराज व माधव महाराज बिल्ली कर तसेच परिसरातील सर्व भजनी मंडळे उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या सुनिता ताई पाटील यांचा वाढदिवस पण साजरा करण्यात आला आणि तसेच त्यासोबत सर्व उपस्थित त्यांनी एकादशी निमित्ताने फराळाचा लाभ घेतला
सदर कार्यक्रमाला पाचोरा शहरातून सर्व प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते व कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना महाराजांनी अजूनही इतर तरुणांना आपल्या जीवनामध्ये व्यसनमुक्त राहून एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे आवाहन केले
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



