मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना तातडीने पैसे परत द्या पाचोरा मानव संरक्षण समितीचे आमदारांना निवेदन
पाचोरा– मानव संरक्षण समिती नवी दिल्ली ( रजि भारत ) सरकार यांच्या पाचोरा तालुका आणि पाचोरा तालुका समितीने पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांना मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे लवकरात लवकर मिळणेबाबत निवेदन दिले.
यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करताना तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकाने गुंतवणूक केलेल्या प्रलंबित रकमेबाबत बोलताना आठ ते दहा वर्षांपासुन भडगाव आणि पाचोरा तालुक्याचे करोडो रूपये अडकून पडले असल्याची तक्रार केली असून निवेदनात मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे अनेक लोक आजारी पडले काहींनी उपासमार करण्याची वेळ आली मग अशा वेळी या गोरगरीब गुंतवणूक दारांना या पैशाचा काहीच उपयोग नसल्याचे म्हंटले असून मैत्रेय कंपनी असोसिएशन मधील प्रतिनिधी प्रतिनिधी व ग्राहक यांच्यात अनेकदा चर्चा झाली असून अद्याप ग्राहकांना अडकलेली रक्कम परत न मिळाल्याची तक्रार देखील करण्यात आलेली आहे. हा विषयी शासनाकडे पोहोचविला असून या विषयाची शासनाने दखल घेत मैत्रेय कंपनीची मालमत्ता शासनाने शासनाकडे जमा केले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले असले तरी मैत्रेय ग्राहकांना पैसे परत मिळत नाहीत याबद्दल समितीचे अध्यक्ष दुसाने यांनी खेद व्यक्त केला असून जास्तीत जास्त लक्ष घालुन गोरगरिब लोकांना पैसे मिळवुन देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून आमदार किशोर पाटील यांनी हा विषय लवकरार लवकर निकाली लावु असे आश्वासन दिले.
निवेदनावर तालुका अध्यक्ष शशिकांत दुसाने, सचिव महेश कौंडिण्य, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षर्या असून यावेळी महिला उपाअध्यक्षा किरणताई पाटील , पाचोरा तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनीताई पाटील. पाचोरा तालुका कायदेशीर सल्लागार मानसिंग सिध्दू आणि पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील आदी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा, बेल चीन्हावर क्लिक करून पोर्टल सबस्क्राईब करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377