आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

देशाच्या राजधानीत केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत “वूमन फॉर ट्रीज” मध्ये सहभागी पाचोरा येथील महिला बचत गटांचा गौरव

पाचोरा – केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत “वूमन फॉर ट्रीज” मध्ये सहभागी महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दिनांक १३ मार्च रोजी “अमृत मित्र महोत्सव” हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर हे होते व शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास देशभरातील 30 राज्यांमधून महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे एका नगरपरिषदेचे सर्वात जास्त प्रतिनिधी म्हणून पाचोरा शहराचे 80 महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात अमृत योजना विषयीच्या चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांमार्फत केलेल्या वृक्षारोपण कामाची माहिती दिली.

शहरात ओपन स्पेस सुव्यवस्थित असल्याने वृक्षलागवड करणे शक्य झाले.महिला बचत गटांना नगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक कामे मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमामुळे पाचोरा शहरातील बचत गटांचा उत्साह नक्कीच वाढणार असून येत्या काळात अधिकाधिक कामे करण्यास महिला सक्षम होतील.


सदर कार्यक्रमास महिला बचत गटांसोबत जिल्हा सह आयुक्त जनार्दन पवार , मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे , कर अधीक्षक दगडू मराठे, शहर अभियान व्यवस्थापक अर्जुन भोळे, पाणीपुरवठा अभियंता श्रुतिका धात्रक , भंडारपाल प्रगती खडसे , समूह संघटक कुणाल तायडे उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!