आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा गुर्जर समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान समाज बांधवांच्या सन्मानासाठी 1 नोव्हेंबर 2026 रोजी होणार मेळावा

पाचोरा गुर्जर समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान समाजबांधवांनी सन्मानासाठी माहिती 15 ऑक्टोबरपूर्वी पाठवावी

पाचोरा : समाजातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची नोंद व्हावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पाचोरा शहर व परिसरातील गुर्जर समाजाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवार, 1 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता स्वामी लॉन्स, पाचोरा–भडगाव बायपास हायवे, गजानन पेट्रोल पंपाजवळ, पाचोरा येथे भव्य मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षण, प्रशासन, बँकिंग, सामाजिक, राजकीय, उद्योग, सेवा, क्रीडा, कला, विज्ञान, संशोधन आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, यासाठी दहावीमध्ये 80 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, बारावीमध्ये 65 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणात 65 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. तसेच NEET, JEE, MHT-CET, MPSC, UPSC, CA, CS, CMA, NET, SET, GATE यांसह विविध मान्यताप्राप्त स्पर्धा व व्यावसायिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानाची संधी उपलब्ध आहे. विद्यापीठस्तरावरील विशेष कामगिरी तसेच क्रीडा, कला, सांस्कृतिक, विज्ञान व संशोधन क्षेत्रातील तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचाही विचार करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा बँकेसाठी विविध संस्थांमधून ठराव झालेले व निवडून आलेले सदस्य, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी, विविध क्षेत्रांत पदोन्नती मिळवून महत्त्वाच्या पदावर कार्यरत झालेले समाजबांधव, शासकीय, निमशासकीय, बँकिंग, शिक्षण, उद्योग व अन्य क्षेत्रांतून सेवानिवृत्त झालेले समाजबांधव, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून यापूर्वी सन्मानित झालेले मान्यवर, तालुकास्तरावर महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेले दिवंगत व विद्यमान मान्यवर तसेच त्यांच्या वारसदारांचा सन्मानासाठी योग्यतेनुसार विचार करण्यात येणार आहे. समाजासाठी विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या अन्य कर्तृत्ववान व्यक्तींनाही या उपक्रमातून गौरविण्यात येणार आहे. सन्मानासाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तींची माहिती, छायाचित्र, शैक्षणिक किंवा व्यावसायिक तपशील, कर्तृत्व, उपलब्धी आणि कार्याचा संक्षिप्त परिचय संकलित करून विशेष डिजिटल PDF माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे.

निवडक गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांची माहिती रंगीत वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाचोरा शहर, तालुका व परिसरातील गुर्जर समाज तसेच रेवा-लेवा गुर्जर, बडगुजर, दोडे गुजर आणि तत्सम पोटजातीतील पात्र विद्यार्थी व कर्तृत्ववान समाजबांधवांनी आपली संपूर्ण माहिती व छायाचित्रे 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत WhatsApp द्वारे पाठवावीत. त्यानंतर प्राप्त होणारी माहिती सन्मानासाठी विचारात घेतली जाणार नाही. माहिती पाठविण्यासाठी संदीप महाजन, मोबाईल 8668529823 या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क साधावा. हा क्रमांक केवळ माहिती व छायाचित्रे पाठविण्यासाठी असून त्यावर फोन करू नये. अन्य माहितीसाठी 7588645907, 7385108510, 9422275807 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. समाजातील गुणवंतांचे कर्तृत्व पुढे आणण्यासोबतच त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन समाजाचा इतिहास आणि उपलब्धी जतन करण्याच्या या उपक्रमात पात्र व्यक्तींनी वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!