आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्राईम,आर्थिक गुन्हे
Trending

“पाचोरा शहरातील बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस ; मध्यप्रदेशातून आंतरराज्यीय आरोपी ताब्यात,पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई”

पाचोरा – शहरातील बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आणत पाचोरा पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातून आंतरराज्यीय आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम ७७,५००/- हस्तगत केली आहे.
दिनांक १९/०८/२०२६ रोजी फिर्यादी दिनेश निलेश सोनवणे, वय ३० वर्षे, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर हे पाचोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ते मोटारसायकलचे काम करण्यासाठी स्वराज्य ऑटो गॅरेज, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, पाचोरा येथे गेले. त्यांनी रोख रक्कम असलेली बॅग गॅरेजमध्ये ठेवली असता, ते वाहनाचे काम करण्यात व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने नजर चुकवून बॅगेसह ७७,५००/- रोख रक्कम चोरी करून नेली. याबाबत दिनांक २१/०८/२०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहोम, पाचोरा भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शोध पथकांतील अधिकारी / अंमलदार यांना तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पाचोरा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकांतील पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. CCTV फुटेजमध्ये काही संशयित इसम फिर्यादीचा बँकेपासून स्वराज्य ऑटो गॅरेजपर्यंत पाठलाग करून रेकी करताना दिसून आले. CCTV फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर संशयित इसम हे मध्यप्रदेशातील सांसी कडिया, जि. राजगड येथील असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार दिनांक ०१/१०/२०२६ रोजी “ऑपरेशन MP” सुरु करुन पाचोरा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकांतील अधिकारी/ अंमलदार यांना मध्यप्रदेश राज्यात रवाना करण्यात आले

सदर पथकाने मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोड़ा पोलीस ठाणे हद्दीतील सांसी कडिया गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिनांक ०३ / १० / २०२६ रोजी अचानक धाड टाकून आरोपी रितीक राजाराम सिसोदिया, रा. सांसी कडिया, जि. राजगड, मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले.आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम ७७,५००/- हस्तगत करण्यात आली असून आरोपीस पुढील तपासकामी घेण्यात आले आहे.

सदर कारवाईदरम्यान पथकाने मध्यप्रदेशातील अतिसंवेदनशील भागात जाऊन केलेली कारवाई ही उल्लेखनीय आहे. मध्यप्रदेशातून आरोपीसह चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची पाचोरा पोलिसांची ही प्रभावी कारवाई ठरली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल काशीनाथ शिंपी हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, श्री बापु रोहम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांचे नेतृत्वात पोहेकॉ / उमेश देविदास पाटील, पोहेकॉ / राहुल काशीनाथ शिंपी, पोकों / हरीश कनिराम परदेशी, पोकॉ/ श्रीराम अरुण शिंपी यांचे पथकांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!