आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्राईम,आर्थिक गुन्हे
Trending

पाचोऱ्यात सोनसाखळी चोरी; दुचाकीस्वारांनी ३ लाखांचा ऐवज लांबवला – घटना CCTV मध्ये कैद

पाचोरा गुन्हेगारी जगताचे नंदनवन ?

पाचोरा, दि. २3 – पाचोरा शहरातील शांती नगर परिसरात सोनसाखळी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची, अंदाजे ३ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना काल सायंकाळी दी 22.9.26 रोजी घडली आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

*व्हिडिओ :* सोनसाखळी चोरीची थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:35 वाजेच्या सुमारास परिसरातील एका गल्लीत दोन महिला उभ्या असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि भरधाव वेगात पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दुचाकीवर येतात, एका महिलेच्या गळ्यातील चैन ओढून नेतात आणि क्षणात पसार होतात हे स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेमुळे शांतीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पाचोरा शहरात रात्री व दिवसा ढवळ्या वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!