आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्राईम,आर्थिक गुन्हे

पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी: खुनाच्या प्रयत्नातील फरारी आरोपीला अटक

पाचोरा (जळगाव) दि.७ सप्टेंबर २०२६ – पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ठाणे ग्रामीण जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला पाचोरा शहरातून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे.

घटनेचा थोडक्यात तपशील :

पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशान्वये दि. ०७/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पाचोरा शहरात चोरी व मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले होते. या पथकात पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ गजानन देशमुख, पो कॉ शरद पाटील आणि पो कॉ श्रीराम शिंपी यांचा समावेश होता.

शोध मोहिमेदरम्यान पोहेकॉ राहुल शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किन्हवली पोलीस ठाणे, जि. ठाणे ग्रामीण येथील गु. र. क्र. ३३१/२०२६ (कलम १०९(१), ६१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३) मधील संशयित आरोपी प्रितम नवनीत पाटील (वय २५, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) हा गुन्हा घडल्यापासून फरार असून सध्या पाचोरा येथे आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ खाजगी वाहनाने पाचोरा शहरात रवाना होऊन आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा माग काढला. त्याचे लोकेशन भाजीमंडी, पाचोरा येथे मिळून आले.

भाजीमंडी परिसरात एक संशयित इसम भाजीपाला घेत असताना आढळला. पोलिसांनी संशयावरून त्याला सायंकाळी ६.३० वाजता ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रितम नवनीत पाटील असल्याचे सांगितले. गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यात आणून किन्हवली पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. किन्हवली पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोपविण्यात आले आहे.

कामगिरी करणारे पथक :

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेकॉ राहुल शिंपी, पोहेकॉ गजानन देशमुख, पो कॉ शरद पाटील आणि पो कॉ श्रीराम शिंपी यांनी पार पाडली.

पाचोरा पोलिसांच्या या जलद आणि सतर्क कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!