आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्रीडा व मनोरंजन
Trending

चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पाचोऱ्याच्या महिला मल्लांची बाजी

चाळीसगाव – येथे दि.24 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पाचोरा येथील तारा राणी महिला क्रीडा संकुल (नगरपालिका टाऊन हॉल) च्या महिला मल्लांनी घवघवीत यश मिळवले आहे. 39 किलो वजनी गटात शगुन पाटील, 43 किलो मध्ये आरुषी पाटील, 46 किलो मध्ये धनश्री पाटील, 55 किलो मध्ये तनुजा तेली, 62 किलो मध्ये अक्षरा बागुल आणि 65 किलो मध्ये शर्वरी कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या सर्व विजेत्या मल्ल वस्ताद दिनेश पैलवान पाटील यांच्या शिष्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे. कुस्ती सारख्या पुरुषप्रधान खेळात पाचोऱ्याच्या मुलींनी मिळवलेले हे यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशामुळे तारा राणी संकुलाचे नाव जिल्ह्यात उज्वल झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!