
जळगाव:- माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येणार आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ४ (१) (ख) अन्वये निर्धारित माहिती प्रकट करणे आवश्यक आहे. तसेच कलम ४ (२) व ४ (३) नुसार माहितीच्या प्रसाराची पद्धत विहित करण्यात आली आहे. सार्वजनिक प्राधिकरणांची कार्ययंत्रणा अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत व्यक्तीगत अर्ज करण्याची गरज कमी करण्यासाठी कलम ४ अन्वये वेबसाईटवर माहिती प्रकट करणे अपेक्षित आहे.
शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार विषयावर प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा यापूर्वी घेऊन त्यांचे निकाल २८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने समाज कार्यकर्ते व इच्छुक गटांसाठी भिंतीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी स्थानिक पातळीवर लॉयन्स क्लब, रोटरी क्लब तसेच विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने पारितोषिकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



