मानसिंगका नगरची घरे नावावर होणार; आ. किशोर आप्पा पाटील यांच्याकडून आढावा बैठक
पाचोरा दि.16 – पाचोरा शहरातील मानसिंगका नगर भागातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व गेले सुमारे 40 वर्षे अनिरणीत असलेल्या घरांचा विषय प्रगतीपथात आला असून लवकरच ही घरे मूळ मालकांच्या नावे लागणार आहेत. या संदर्भात गुरुवार दि.16 रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.पाचोरा शहरातील मोठा उद्योग असलेला मानसिंगका इंडस्ट्रीजच्या सोसायटीचे सुमारे अडीचशे घरे असून यात मानसिंग का नगर कॉलनी क्रमांक एक दोन व तीन अशी विभागणी असून दरम्यानच्या काळात मानसिंगका उद्योग बंद झाल्याने अनेक वर्षापासून मूळ मालकांच्या नावे सदर घरे करण्याबाबतचा विषय प्रलंबित आहे. मात्र यात अनेक प्रशासकीय अडचणी असल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुढाकार घेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या असून एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन लवकरच यासंदर्भात मानसिंगका नगर भागातील मंदिरावर सर्व स्थानिक नागरिक व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन तेथेच हा विषय मार्गी लावणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे.
बैठकीला प्रांताधिकारी भूषण अहिरे,बाजार समितीची सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, सहकार विभागाचे तालुका निबंधक आर आर पाटील,सहाय्यक अधिकारी दीपक पाटील,अवसायाक हरिदास पाटील,शहर तलाठी आर. डी. पाटील यांचेसह स्थानिक रहिवासी व शिवसैनिक राजू पाटील,युवा सेनेचे प्रेमराज पाटील, जगदीश कानडे, अक्षय देशमुख, राकेश भावसार,राजू काळे,सागर पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377