आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

आव्हानातुन गरुडझेप: डॉ. सुवर्णा पाटील यांना पीएच्.डी. प्रदान; महिलांच्या मानसिक स्वास्थ्याचा जागर

पाचोरा, दि 8 – आजच्या आधुनिक युगात स्त्रीने चूल आणि मूल या पलीकडे जाऊन अंतराळापासून प्रशासनापर्यंत सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मात्र, ही प्रगती साधताना महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन पाचोरा येथील श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुवर्णा राजेंद्र पाटील यांनी केले. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे आणि त्यांना नुकतीच प्राप्त झालेल्या पीएच्.डी. पदवीच्या गौरव सोहळ्याचे.संशोधनातून मांडले पोलीस दलाचे वास्तवप्रा. सुवर्णा पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएच्.डी. पदवी प्रदान करण्यात आली. साक्री येथील डॉ. जयप्रकाश चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर नोकरीच्या संस्कृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर सखोल शोधप्रबंध सादर केला.

पोलीस दलातील आव्हानात्मक नोकरीचा त्यांच्या कौटुंबिक आणि आरोग्यावर होणारा परिणाम त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडला आहे. पोलीस हे. कॉ. श्री. राजेंद्र पाटील यांच्या त्या धर्मपत्नी असल्याने त्यांनी हा विषय अतिशय जवळून अनुभवला असून, त्यांचे हे संशोधन भविष्यातील धोरणात्मक बदलांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.मानसिक आरोग्य: आधुनिक स्त्रीची खरी शक्तीमहिला दिनानिमित्त ‘आव्हानांमधून उभारी घेणारी आधुनिक स्त्री’ या विषयावर बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या की,”मानसिक स्वास्थ्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नव्हे, तर मन शांत, संतुलित आणि सकारात्मक असणे होय. जेव्हा स्त्री मानसिकदृष्ट्या सक्षम असते, तेव्हाच ती आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते.”नोकरी आणि घरची जबाबदारी पेलताना महिलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. घरातील पुरुषांनी आणि समाजाने जबाबदाऱ्यांमध्ये वाटा उचलल्यास स्त्री अधिक जोमाने प्रगती करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यशस्वी जीवनासाठी डॉ. पाटील यांचा सल्ला:स्वतःसाठी वेळ काढा: कामाच्या व्यापात स्वतःचे छंद जोपासा.आरोग्याची काळजी: नियमित योगासने आणि संतुलित आहार घ्या.संवाद साधा: ताण जाणवल्यास कुटुंबाशी किंवा तज्ज्ञांशी चर्चा करा.

महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार या दैदिप्यमान यशाबद्दल श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सुवर्णा पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले मार्गदर्शक, सहकारी आणि खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या कुटुंबीयांना दिले आहे.”नाजूक दिसते पण ताकद पर्वताएवढी असते, स्वप्नांना पंख देऊन आकाश गाठण्याची जिद्द तिच्यात असते…” अशा शब्दांत त्यांनी सर्व कष्टकरी महिलांना शुभेच्छा देत स्त्रीशक्तीचा सन्मान केला.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!