पाचोऱ्यात विद्यापीठस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन; AI वर होणार वैचारिक मंथन

पाचोरा, दि. २८ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते माजी आमदार कै. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ व्या वर्षी विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : मानवासाठी शाप की वरदान!’ हा यावर्षीच्या स्पर्धेचा विषय असून स्पर्धा दि. १६ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता ICT सभागृह, श्री. शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा येथे होणार आहे.
पारितोषिके:
प्रथम क्रमांक – रु. ११,०००/-, द्वितीय – रु. ७,०००/-, तृतीय – रु. ५,०००/-, तर दोन उत्तेजनार्थ – प्रत्येकी रु. २,१००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क १०० रुपये असून दि. १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धा फक्त मराठी भाषेत होईल. प्रत्येक स्पर्धकाला ६ मिनिटे वेळ दिला जाईल. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. वासुदेव वले, डॉ. माणिक पाटील (९९६०१९५७), प्रा. स्वप्नील भोसले (९०६०६३१९४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



