पाचोरा – येथील गिरणाई शिक्षण संस्था आयोजित “पालक शिक्षक मेळावा” उत्साहात संपन्न झाला. काल दिनांक 30 सप्टेंबर सोमवार रोजी, दुपारी 4 वाजता स्वामी लॉन्स, गजानन पेट्रोल पंपाशेजारी भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याला सुमारे 2000 पालक उपस्थित होते. गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालय, सौ. सा. प. शिंदे प्राथमिक शाळा, पंडितराव शिंदे माध्यमिक शाळा, सिंधुताई शिंदे प्राथमिक शाळा, तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूल आणि शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च या सर्व शाखांचा संयुक्त पालक मेळावा काल आयोजित करण्यात आला होता. युवा नेते अमोल भाऊ शिंदे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, संस्थेचे सचिव ॲड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव डॉ. शिवाजी शिंदे, गिरणाई पतसंस्थेचे चेअरमन सतीश बापू शिंदे, केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार व संस्था संचलित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक मंचावर उपस्थित होते.दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर, संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ताधारक शिक्षक, शिक्षिका आणि विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक, व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात पालकांचे उद्बबोधन केले. प्रत्येक मुलाचे वेगळेपण, बदलती सामाजिक परिस्थिती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची जाणीव जागृती, चालू घडामोडींची जाणीव जागृती, बालकांचे शारीरिक व बौद्धिक आरोग्य, पालक म्हणून विद्यार्थ्यांबाबत असलेल्या जबाबदाऱ्या, बालक व पालक सहसंबंध अशा विविध अंगी विषयांवर गणेश शिंदे यांनी उद्बबोधन केले. गणेश शिंदे यांच्या ओघ, विनोदी व मार्मिक शैलीमुळे कार्यक्रमाला रंगत आली.मेळाव्याचे अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी शिक्षणाच्या अमुलाग्र बदलांसोबतच शिक्षण संस्था आणि पालकांची वाढलेली जबाबदारी यावर आपले विचार व्यक्त केले. संस्थेची गुणवत्ता आणि भविष्यातील वाटचाल याबाबत चे संकल्प व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष निरज मुनोत यांनी प्रास्ताविक केले. सुषमा पाटील यांनी वक्त्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन संस्थेचे सह डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कलाशिक्षक व्हि.पी. देशमुख यांनी ईशस्तवन तर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी श्रावणी चिंचोरे, लावण्या मोरे, अंतरा पाटील, वेदिका कोष्टी यांनी स्वागत गीत सादर केले. नियोजनबद्ध कार्यक्रमाची रचना, पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांचे मौलिक विचार हे या पालक शिक्षक मेळाव्याचे वैशिष्ट्ये होते. संस्थेतील सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377