शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी असमान निधी योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. सन 2024-25 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्य सर्वांगिण विकासासाठी अर्थसहायच्या विविध योजना राबविण्यात येत असून, समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार, तसेच असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ , साधन सामग्री, फर्निचर, इमारत बाधकाम व विस्तार, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी व आधुनिकीकरण करण्यासाठी, महोत्सवी वर्ष जसे 50, 60,75,100,125,150 वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमासाठी तसेच बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय “ बाल कोपरा स्थापन ” करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासंबंधीची माहिती, नियम अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय, येथे संपर्क साधून ग्रंथालयांनी वरील पैकी एका योजनेसाठीचा प्रस्ताव इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत सादर करावे. असेही ग्रंथालय संचालक श्री अशोक गाडेकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377