महिला दिना निमीत्त पंचरत्न प्रतिष्ठान तर्फे महिला महोत्सवाचे आयोजन, स्पर्धे साठी संपर्क साधावा

पाचोरा, दि 1 – “घर आणि जग चालवणारी, आधुनिक रणरागिणी तुला सलाम!” या घोषवाक्याने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान , पाच मैत्रिणी एकत्र येऊन त्यांच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दि. ७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शक्तीधाम येथे पार पडणार आहे.महिलांच्या सर्वांगीण सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीमती पाचोरा’ स्पर्धा ही विवाहित महिलांसाठी खास आकर्षण ठरणार असून पारंपरिक वेशभूषेत परिचय, दिलेल्या विषयावर मत व्यक्त करणे आणि प्रश्नमंजुषा अशा तीन फेऱ्यांमधून स्पर्धकांची निवड होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.याशिवाय विवाहित महिलांसाठी एकल नृत्य स्पर्धा, ४ ते ८ जणींच्या गटासाठी सामूहिक नृत्य स्पर्धा, सामाजिक संदेश देणारी उखाणे स्पर्धा, तसेच मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व स्पर्धांमध्ये आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. ‘होम मिनिस्टर गेम’ हा कार्यक्रमातील विशेष आकर्षण असून तो उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रवेश फी विरहित असणार आहे.महोत्सवातील बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ६ वाजता होणार आहे. तसेच ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता श्री शेठ मुरलीधर मानसिंगा महाविद्यालय मैदान येथे महिलांसाठी विशेष ‘महिला मॅरेथॉन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. १८ ते ३५ वयोगट आणि ३६ वर्षांवरील गट अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून प्रथम २०० स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. सहभागी महिलांनी पांढऱ्या रंगाची वेशभूषा परिधान करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे महिलांना स्वतःसाठी वेळ देत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर स्पर्धेबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे तपशीलवार दिलेले असून संबंधित स्पर्धेसाठी संपर्क क्रमांक दिलेले असून यावर अधिक माहिती जाणून घेता येईल सदर स्पर्धा या सर्व महिलांसाठी असुन त्यांनी आपल्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळावा म्हणून व आपल्या महिला भगिनींचे कौतुक करावे यासाठी नक्कीच स्पर्धेवेळी हजर राहावे असे अपेक्षित आहे
८मार्च जागतिक महिला दिन निमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आयोजि महिला महोत्सवातील
विविध स्पर्धा..
दिनांक ७ मार्च…..
स्थळ….शक्तीधाम (राजीव गांधी कॉलनी)
वेळ सकाळी १०ते६
1)* श्रीमती पाचोरा स्पर्धा.🧜♀️🧜♀️
नियम……1 सदर स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी आहे.
2 स्पर्धेच्या 3 फेऱ्या होतील
पहिली फेरी.. पारंपरिक वेशभूषेत परिचय ..
दुसरी फेरी… चिठ्ठीतून आलेल्या विषयावर दीड मिनिट मत व्यक्त करणे.
तिसरी फेरी… प्रश्नमंजुषा फेरी.
प्रवेश फी १०० रु
बक्षिसे….प्रथमरु ३००० आणि सन्मानचिन्ह द्वितीयरु २००० आणि सन्मानचिन्ह
तृतीय_ रु १०००आणि सन्मानचिन्ह
नावनोंदणी संपर्क
वैशाली पाटील_
९४२०३५०१७१
2 एकल नृत्य स्पर्धा .💃💃
.वेळ ३मिनिट
. विवाहित महिला
विषय_ कुठल्याही भाषेतील सिनेमा गीत /सिनेमा बाह्य गीत)
प्रवेश फी… रु ५०
बक्षिसे_प्रथम…. रू १०००आणि सन्मानचिन्ह
द्वितीय….. रु ७०० आणि सन्मानचिन्ह
तृतीय……रु ५०० आणि सन्मानचिन्ह….
सामुहिक नृत्य स्पर्धा.
💃💃.वेळ ३मिनिट
(सिनेमा गीत किंवा सिनेमा बाह्य गीत)
एकूण संख्या..४ते८
प्रवेश फी रु .२००
बक्षिसे..
प्रथम..रु३१०० आणि सन्मानचिन्ह
द्वितीय.. रु२१०० आणि सन्मांचीन
तृतीय…रु ११०० आणि सन्मानचिन्ह
नावनोंदणी संपर्क..मंजुश्री शिरसमने ७०२८४३६०५४
उखाणे स्पर्धा..🙆🏻♀️🙆🏻♀️
उखाणा ४ते ५ओळीत सामाजिक संदेश देणारा असावा..
प्रवेश फी..रु ५०
बक्षिसे..
प्रथम रु.७०० आणि सन्मानचिन्ह
द्वितीय रु ५००आणि सन्मानचिन्ह
तृतीय रु २०० आणि सन्मानचिन्ह
नावनोंदणी संपर्क…
अंजली गवंदे..७५८८०११३२४
मेहंदी स्पर्धा…🧏🏻♀️🧏🏻♀️
व्यावसायिक महिलांनी सहभागी होऊ नये…
वेळ ..30 मिनिट
प्रवेश फी…रु५०
बक्षिसे.
प्रथम…रु ७०० आणि सन्मान चिन्ह
द्वितीय.. रु ५०० आणि सन्मानचिन्ह
तृतीय….रु.३०० आणि सन्मानचिन्ह
नावनोंदणी संपर्क..सुषमा पाटील
९६६५१४६६११
होम मिनिस्टर गेम👼👼
(संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी प्रवेश फी विरहित)
सदर वरील सर्व स्पर्धा दिवसभरात संपन्न होतील आणि म्हणूनच महिला महोत्सव घोषित केला आहे.
संपूर्ण स्पर्धा अनुभव घेण्यासाठी संपूर्ण दिवस एन्जॉय करू या..
बक्षीस समारंभ
सायंकाळी ६ वाजता….
आणि
महिलांसाठी खास….
चला स्वतःसाठी पळू या……🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️
महिला मॅरेथॉन स्पर्धा
दि. ८ मार्च,सकाळी ६वाजता
श्री शेठ मुरलीधर मानसिंगा महाविद्यालय मैदान..
नावनोंदणी संपर्क..प्रीती सोनवणे
९८९०६६२०४२
प्रवेशफी नाही..
बक्षिसे
प्रथम…द्वितीय…तृतीय सन्मानचिन्ह..
गट १..वय वर्षे १८ ते 35
गट २..वय वर्ष. ३६पासून पुढे
सहभागी प्रथम २००स्पर्धकांना मेडल
स्पर्धकांनी पांढऱ्या रंगाची वेशभूषा करावी(कुर्ता/ पंजाबीड्रेस/साडी/टी शर्ट)
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



