पंतप्रधान दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्र 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट नो ‘नो फ्लाईंग झोन’
24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत व्यावसायिक उड्डाणे राहतील बंद
जळगाव दि. 22 – पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘ लखपती दीदी ‘ कार्यक्रमाला येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किमीच्या परिघात, “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून 4000 फूट अंतरावर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत “नो फ्लाइंग झोन” म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत.
या आदेशात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट बंदी घालण्यात आली आहे. तर पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याशी संबंधित महत्वाच्या/ अति महत्वाच्या विमानाचे उड्डाणे वगळता व्यवसायिक विमानांचे उड्डाण 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता पर्यंत बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377