भडगाव येथे महिलांसाठी जागर कोजागिरीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न-महिलांची लक्षणिय उपस्थिती
भडगाव – लाडकुबाई माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव च्या प्रांगणात महिलांसाठी जागर कोजागिरीचा हा कार्यक्रम दिनांक 17 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी अतिशय उत्सवात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील हे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका तथा पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आदरणीय डॉ पूनमताई प्रशांतराव पाटील ह्या होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वैशाली शिंदे मॅडम यांनी केले या वेळी जागर कोजागिरीच्या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठीचे विविध पारंपारिक खेळ व विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यात उखाणा स्पर्धा,चालता बोलता कार्यक्रम,संगीत खुर्ची,दोरी उड्या इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी विजेत्या महिलांना भरघोस बक्षीसे देऊन डॉ पुनमताई पाटील यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले
त्यात चालता बोलता या खेळातून सायली निशाणदार प्रमिलाताई चौधरी शिरण खाटीक संगीता पाटील इत्यादी विजेत्यांना गौरविण्यात आले तर संगीत खुर्ची या खेळातून वर्षा सोनजे शीतल पाटील प्रमिला चौधरी व निर्मला महाजन यांना गौरवण्यात आले व उखाणा स्पर्धेसाठी रूपाली महाजन उषाबाई सोनजे इत्यादी महिलांना गौरविण्यात आले या महिला तर्फे आयोजकांचे विशेष आभार मानण्यात आले यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये हसमुर पिंजारी पूजा कोळी सरलाबाई महाजन रूपाली महाजन जनाबाई पाटील इत्यादींना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत डॉ पुनमताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या कार्याचा लेखाजोखा उपस्थित महिलांसमोर मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली देवरे मॅडम यांनी केले तर आभार सौ डी टी पाटील मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377