संत गाडगेबाबा नगर चौक येथील वटेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न

पाचोरा येथे भडगाव रोड हायवे वरील संत गाडगेबाबा नगर चौक येथील वटेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने खिचडी,लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले होते तसेच भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आलेले होते
सालाबाद प्रमाणे यावर्षीही पाचोरा येथील वटेश्वर महादेव मंदिराची पूजा अर्चा करून प्रसादाचे आयोजन केले होते .सदर परिसरातील सीनियर सिटीजन नव युवक,महिला भगिनी यांची येथे नियमित पूजा करीत असताना महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी पूजाच्या सांस्कृतिक ,ठेवा जपणारे कार्यक्रम तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून भंडाऱ्याचे आयोजन केले गेले होते सदर आयोजन हे सालाबाद प्रमाणे असून पाचोरा शहरातून अनेक शिवभक्त येथे हजेरी लावताना दिसतात. यातील बरेच भक्तगण हे नियमित मंदिरामध्ये येऊन पूजा –अर्चा करतात व पुढील मार्गदर्शन सिनिअर सिटीजन यांचे घेऊन प्रत्येक जण आपल्या ओळखीने नगरसेवक, नगराध्यक्ष ,आमदार यांच्या पर्यंत आपले तक्रार मांडताना दिसतात व त्याच तत्परतेने सदर तक्रारीचे निरसन, करणारेही प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हे सहकार्य करीत असतात वटेश्वर महादेवाची ही परंपरा अशी सतत पुढे सुरू राहील यात काही शंका घेण्यासारखे नाही
सदर जागे चे ठिकाणी वार्डातील नगरसेवक सभापती श्री.गणेश पाटील सौ मीनाक्षीताई – संजय एरंडे, तसेच सूरज वाघ हे देखील या ठिकाणी शिवभक्तांना भेटण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आवर्जून हजर होते. शिवाय वेळप्रसंगी काही मदत लागल्यास या प्रतिनिधी द्वारे तात्काळ सदर मंडळाचे कार्यकर्त्यांना अवगत केले जाते किंबहुना यांच्याकडून होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठी मदत मिळत असते सदर ठिकाणी उपक्रम राबवून येथील परिसरातील नवयुकांनी एक चांगला आदर्श निर्माण केलेला बघावयास मिळतो येथे रोज सकाळ संध्याकाळ दुपार व रात्री अनेक भक्तगण येऊन बसलेले दिसतात,सीनियर सिटीजन येथे नियमित त्यांची दैनंदिन गप्पांचा कट्टा रंगवत असतात
सदर मंदिराचे परिसरात नगरसेवक गणेश पाटील व मीनाक्षीताई एरंडे यांच्यामार्फत सुशोभीकरणाचे काम देखील होत असून लवकरच हा परिसर सौंदर्याने नटलेला असणार आहे सालाबाद प्रमाणे येथे भक्तगण भंडाऱ्यातील महाप्रसादाचाही आनंद उपभोगत असतात.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



