पाचोऱ्यात उद्या ‘शिवसंवाद दौरा’; शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू साधणार संवाद

पाचोऱ्यात उद्या शिवसंवाद दौरा – बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांची संवाद.
पाचोरा,दि.२३ – शिवसेनेतर्फे संघटन बांधणी मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या गुरुवारी (दि.२४) पाचोरा येथे ‘शिवसंवाद दौऱ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे सकाळी १० वाजता हा संवाद कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यात शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते शेतकरी, गोरगरीब, दिव्यांग आणि विविध सामाजिक घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमास जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख आ. दिलीप लांडे, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख आ. तुकाराम काते आणि पाचोरा-भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, शेतीचे प्रश्न आणि सामाजिक समस्यांवर चर्चा करून पक्षाची पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



