आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हाताज्या बातम्या
Trending

भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे;अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना, पाचोरा

पाचोरा दि,15: भडगाव प्रकरणात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना छळणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकारी धामोरे यांची पाठराखण करत शिवसेनेवर टीका करणापेक्षा भाजपाने त्यांची बांधिलकी नेमकी शेतकाऱ्यांसोबत की सहकारी कर्मचाऱ्यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत हे आधी स्पष्ट करावे तसेच जनतेला भ्रमित न करता  कै.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे व त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा मुख्य सूत्रधार  महावितरणचे अभियंता धामोरे यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या साठी प्रयत्न करावेत, असा सनसनाटी टोला शिवसेनेचे पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी अभियंता धामोरे यांचेवर अविश्वास व्यक्त करत प्रसिद्धी पत्रक काढत सत्य घटना कथन केली आहे त्यानुसार सोमवार दि ०७ जून रोजी शिवसेनेने पाचोरा विभागातील सर्व कार्यालयांना व उपकेंद्रांना ताला ठोको आंदोलन केले हे आंदोलन शांततेत समाप्त झाल्यानंतर म्हणजे सुमारे १२:४५ वाजता काही अज्ञात लोकांनी उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली व उपकार्यकारी अभियंताना यांना मारहाण केली इतपत हे सत्य आहे परंतु  कै.राणे हे भांडणं सोडविण्यासाठी गेले व त्याच्यात त्यांचा म्रुत्य झाला हे साफ चूकीचे व खोटे आहे.

सत्य परिस्थिती अशी आहे की, उपकार्यकारी अभियंता यांना मारहाण झाली तेव्हा कै. राणे हे काही सहकाऱ्यांसोबत उपविभागात होते  अज्ञात मारेकरी हे जेव्हा बाहेर आले तेंव्हा उपकार्यकारी अभियंता धामोरे हे मारेकऱ्यांचा पाठलाग करत होते त्यांच्या मागे उपविभागातील काही कर्मचारी पण होते व त्यामध्ये राणे पण होते,मारेकरी फरार झाल्यानंतर राणेंची तब्येत बिघडली व शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये राणेंना हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा म्रुत्य झालेला आहे असे निर्देशीत केलेले आहे, अभियंता संघटनेने आपल्या चारही संघटनेची दिशाभुल करून आपला पाठिंबा मिळवून दि. ८ जून रोजी गेटमीटींग करून घेतली व तेथे भासविण्यात आले की,कै राणेंचा म्रुत्य हा हाणामारीत झालेला आहे व तशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली याबाबतची सत्यता भडगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांना माहीत आहे

खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ग्राहकांचा व शिवसेनेचा आपल्या कर्मचाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्याची शक्यता आहे व कर्मचारी हे दहशतीत व भांबावलेले आहेत तरी आपण चारही संघटनेच्या पाचोरा व जळगाव झोनच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक करून सत्य कहाणी ही समाज माध्यमांना देऊन आमचा चारही संघटनेच्या सभासदांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे निर्देशीत केले आहे.तेव्हाच आपल्या सभासंदाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल अशी  भूमिका घेतली आहे.

अमोल शिंदे यांनी  कोविड केअर सेंटर मध्ये भागीदारी करत कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये जनतेची लूट केली आहे त्यामुळे त्यांना जनतेचा किती कळवळा आहे हे सर्वांना कळते ,भोळ्या भाबड्या भडगावकरांची  दिशाभूल करू नये असा गर्भित इशारा प्रसिद्धी पत्रकात शेवटी दिला आहे.प्रसिद्धी पत्रकावर शेतकी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील ,पाचोरा तालूका प्रमुख शरद पाटील  यांचेसह शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांच्या सह्या आहेत.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा, बेल चीन्हावर क्लिक करून पोर्टल सबस्क्राईब करा  

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत

मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\