आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षणताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

पाचोरा जेसीआयचा स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम

रक्तदान हेच श्रेष्ठ दान,ते आहे महान काम त्यामुळे वाचत असतात,गरजू व्यक्तींचे प्राण

पाचोरा – वरील वाक्याला गवसणी घालत आपले सामाजिक बांधिलकी उराशी ठेवत ,समाज उपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत पाचोरा जेसीआय तर्फे सालाबाद प्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पोलीस लाईन भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न झाला. पाचोरा जेसीआय सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असून शहरातून तसेच तालुक्यातून अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबवीत असते जेसीआयच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक असे उपक्रम राबवून तसेच नव युवकांना त्यांचे सर्वांगीण कौशल्य विकसित करून भविष्यातील उमदा व्यक्तिमत्व असलेला बनविणे असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून JCI ही संघटना कार्यरत आहे.

JCI पाचोरा प्रामुख्याने सामाजिक कार्याबरोबर नव तरुणांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व विकास तसेच भावी उद्योजक बनविण्यासाठी विविध कार्यक्रम सेमिनार, ट्रेनिंग घेत असते यातून तरुणांना आपल्यातील उपजत गुण डेव्हलप करण्यास मदत होऊन तो त्याच्या करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत मिळत असते.आपल्या सुप्त कलागुणांना त्यातून चालना मिळत असते त्यामुळे जे सी आय संघटना तिची प्रामुख्याने नवतरुणांना शिक्षित ,प्रशिक्षित बनविण्यासाठी तसेच समाजात यंग लीडर देण्यासाठी नावाजलेली आहे. आपणही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी देणे लागते या भावनेने प्रेरित होऊन सदैव विविध प्रकल्प जेसीआय आपल्या यंग ब्रिगेडच्या व सीनियर सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडत असते.

या रक्तदान शिबिरा वेळी सीनियर मेंबर गिरीश कुलकर्णी व त्यांचे पुत्र पार्थ कुलकर्णी , पुनीत बाजोरिया, अंकित अग्रवाल यांचे सह ईतर सदस्य आदींनी आपले रक्तदान करून समाजसेवेचे कर्तव्य यावेळी बजावले.

सदर कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी जेसीआय सीनियर सभासद जीवन भाऊ जैन,गिरीश कुलकर्णी ,संजय बडोला रितेश ललवाणी ,संजय चोरडिया जेसीआय अध्यक्ष अभिनंदन संघवी ,सेक्रेटरी श्रेयांश ललवाणी, जॉईंट सेक्रेटरी पराग मोर, खजिनदार मितेश जैन युथविंग चेअरमन आनंद बाफना व सदस्य मयूर विसपुते, मयूर दायमा ,रोहित रीजाणी, आनंद जैन तसेच दिग्विजय पटवारी , अंकित राका,आदि JCI मेंबर्स व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य ,नागरीक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला

रेड क्रॉस सोसायटी जळगाव व त्यांचे पदाधिकारी यांनी यावेळी सदर शिबिरासाठी कार्यरत राहून संपूर्ण रक्तदान शिबीराचे वैद्यकीय कार्य पार पाडले.पाचोरा शहरातून या प्रकल्पाचे कौतुक केले जात आहे व भविष्यातही जेसीआय संघटनेमार्फत असेच समाजाभिमुख प्रकल्प घेऊन जनसेवा करीत राहावी अशा शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\