आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा भडगाव विधानसभा गाजणार ! तुतारीच्या एल्गार ने मशालचे काय होणार

पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठक नुकतेच दि 16 ऑगस्ट रोजी महालपुरे मंगल कार्यालय पाचोरा येथे संपन्न झाली.सदर आढावा बैठकी दरम्यान पक्षाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.आढावा बैठक आयोजित करण्यामागे कार्यकर्ते,पदाधिकारी व जनतेमधून येत्या 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणूक संदर्भात तसेच संभाव्य उमेदवार बाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी,व होऊ घातलेला विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे उमेदवारी देणे प्रचार यंत्रणा,कार्यकर्त्यांचे संघटन, ध्येय-धोरणे व महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होऊन उमेदवारास निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने कार्यरत राहून यशस्वी होण्याचा संकल्प या आढावा बैठकीदरम्यान उपस्थितांन मध्ये घेण्यात आला

नानासो संजय वाघ यांचे मनोगत पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

सदर बैठकी साठी नव नियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे उपस्थित झालेले होते.सदर बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले प्रामुख्याने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे वाघ परिवाराला तिकीट मिळावे यासाठी सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली सद्यस्थितीत जागा वाटपाचे अजून निश्चित झालेले नसून कोणीही तिकीट फायनल झाले अशा संभ्रमात राहू नये महाविकास आघाडीतर्फे जो कोणी अधिकृत उमेदवार म. वी.आ देईल त्याचे निवडणूक प्रचार मविआ करेल असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. शेतकऱ्यां संबंधी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यांमध्ये सत्तांतराचे वारे वाहत  असल्याने महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील  विधानसभेच्या जागांपैकी जास्तीच्या जागा या पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आढावा बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमधून अनेक मुद्दे उपस्थित केले गेले परंतु प्रामुख्याने जो भर दिला जात होता तो वाघ घराण्याने येणाऱ्या निवडणुकीत आपली उमेदवारी करावी हे ठामपणे कार्यकर्ते बोलत होते महाविकास आघाडी मधील अन्य घटक पक्ष उबाठा व काँग्रेस हे देखील तिकिटासाठी मागणी करत असल्याने व उबाठाने आपले तिकीट फायनल असल्याचे जाहीर केलेले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला पहावयास मिळाला. लोकसभेवेळी सांगलीतील चंद्रहार पाटलांचे तिकीट जागा वाटपाच्या आधीच उबाठाने घोषित करून व जनमता विरुद्ध उमेदवारी लादल्याने पराभवास सामोरे जावे लागले होते, ती पुनरावृत्ती पाचोरा भडगाव विधान सभेवेळी होऊ नये याकडेही मविआ लक्ष दिले पाहिजे. मतदार संघामध्ये परिवर्तनाची   परिस्थिती निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे वाघ घराण्यातील उमेदवार मिळाल्याने निवडणूक जिंकने सोपे जाईल असेही यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते बोलत होते

सदर आढावा बैठकीत पिटीसी चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या मनोगतातून वाघ परिवाराच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख मांडून सदर मतदार संघात मा.आ स्व.ओंकारआप्पा वाघ तसेच माजी आमदार दिलीपभाऊ वाघ हे सतत निवडणूक लढवत व निवडूनही येत असत शिवाय मतदार संघातील जनतेशी असलेला दांडगा संपर्क, 70 वर्षांची जनतेशी जुळलेली नाळ याची स्पष्टोकती करत वाघ घराण्यातून उमेदवारी मिळाल्यास येथील मतदार संघातून विजय हा निश्चित होईल असेही त्यांनी आपल्या बोलण्यातून कार्यकर्त्यांना आश्र्वस्थ  केले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुतारी  या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल यासाठी वरिष्ठ स्तरावर जिल्हाध्यक्षांमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,शालिग्राम मालकर,श्याम भोसले ,खलीलदादा देशमुख, विकास पाटील सर, सिताराम पाटील सर ,राहुल पाटील ,सत्तार पिंजारी, विजय पाटील ,डॉ. संजीव पाटील ,प्रकाश पाटील, बशीर बागवान ,अझर खान,रेखाताई पाटील भडगाव, रेखाताई देवरे ,स्नेहल गायकवाड यांच्या सह सतीश चौधरी ,प्रकाश भोसले,हरून देशमुख व आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व स्नेही सदर आढावा बैठकीसाठी उपस्थित झालेले होते नानासो संजय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\