पाचोरा भडगाव विधान सभा-2024 निवडणुकीत नवीन भिडूची एन्ट्री❓ सामना रंगतदार होणार अटितटीत कोण येणार !
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक होणार रंगतदार अटीतटीत सुटणार सामना.
जळगाव, दि.10 – भडगाव तालुक्यातील एक विकासाभिमुख नेतृत्व ,संस्थाचालक अनेक राजकीय पदांवर कार्यरत राहिलेले भडगाव तालुक्यातील जनतेशी नाळ असलेली व्यक्तिम्त्व तेथील मतदारांशी असलेला दांडगा संपर्क ,शैक्षणिक संस्थेचे विखुरलेले जाळे नातेसंबंधांमध्ये असलेले संख्याबळ ,हसतमुख, मदतगार अशा नाना विविध उपाधी लाभलेले माननीय नानासो. प्रतापराव हरी पाटील हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकून आखाडयात उतरणार असल्याची खात्रीलायक वृत्त मिळाले असून त्यांच्या या पवित्र्याने विधानसभेचे चित्र पालटणार आहे ? आधीच चौरंगी पेक्षा जास्त इच्छूक उमेदवारी असलेल्या मतदारसंघात या मातब्बर नेत्याची भर पडल्याने राजकीय गणिते बिघडणार आहे यात काही शंका नाही. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा -भडगाव मतदार संघातून निवडून येण्यासाठी साम -दाम -दंड -भेद हे देखील कमी पडता की काय असे चित्र आजच्या या प्रोजेक्टेड असलेल्या सर्व उमेदवारांबाबत अभ्यास केला असता दिसते आहे. निकालाचे चित्र हे अकल्पित असणार असे तरी तूर्तास त्यामुळे म्हणावे लागेल. शिवाय तुल्यबळ नसलेल्या उमेदवारांचे काय भविष्य असेल हे न बोलणे बरे.
भडगाव तालुक्यात बऱ्याच वर्षापासून असलेला राजकीय बॅकलॉग किंवा विकास हा होऊ शकला नाही अशी खंत येथील नागरिक, राजकीय विचारवंत ,नेते बोलून दाखवत असतात आणि आता यापुढे तालुक्यातूनच नेतृत्व पुढे येऊन संधी मिळावी असा मानस येथील जन सामान्यात तसेच भावी उमेदवारांमध्ये निर्माण झालेला असल्याने येथून आता विधानसभेसाठी अनेक इच्छुक दंड थोपटताना दिसत आहे. शिवाय ना.प्रतापराव हरी पाटील यांनी काही राजकीय पक्षांशी तिकीट मिळण्या संदर्भात देखील चाचपणी केली असून जर पक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक नाहीतर अपक्ष उमेदवारी करावी ही जन सामान्य तसेच कार्यकर्त्यांची इच्छा असून आपल्या तालुक्याला न्याय मिळावा यासाठी ते कदाचित आपली उमेदवारी येत्या काही दिवसात घोषित करतील असे तरी तूर्तास सुरू असलेल्या बैठकांमधून निष्पन्न होताना दिसत आहे. परंतु इलेक्शन आले की अशा प्रकारे चाचपणी केली जाते असा नेहमीचाच संकेत असतो आता पुढील काळात काय काय घडामोडी होतात व किती उमेदवार रिंगणात येतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे परंतु या एंट्रीमुळे सगळ्यांचेच गणिते चुकतील असे चित्र तूर्तास निर्माण झाले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377