राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी परमेश्वर पाटील यांची नियुक्ती,खेडगाव नंदीचे येथील निष्ठावंत कार्यकर्त्याकडे तालुक्याची धुरा

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आता खेडगाव नंदीचे येथील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते श्री. परमेश्वर सुभाष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पांडुरंग पाटील यांनी नुकताच यासंदर्भातील नियुक्तीपत्र दिले.

पाचोरा तालुक्यातील पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून तालुकाध्यक्षपद रिक्त असल्याने पक्षाच्या स्थानिक कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे ही नियुक्ती कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे.
नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी परमेश्वर पाटील यांच्या निष्ठा आणि पक्षासाठीच्या योगदानाचा गौरव केला. तसेच आगामी जि.प / प.स. /स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पक्ष संघटना वाढवणे, बुथस्तरावर कार्यकर्ते सक्रिय करणे आणि शेतकरी, युवक, महिला यांचे प्रश्न मार्गी लावणे ही नवी जबाबदारी पाटील यांच्याकडे असेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाचोरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी परमेश्वर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाला न विसरता पाचोरा तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही दिली. “शरद पवार साहेबांच्या विचारांवर चालत सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणे हेच माझे ध्येय असेल,” असे ते म्हणाले.
पाचोरा तालुका हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा राजकीय पट्टा मानला जातो. येथे शरद पवार गटाने संघटना बांधणीसाठी अनुभवी आणि गावपातळीवरील कार्यकर्त्याला संधी दिल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.
✍️@UR/उरा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



