श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘युवा जलदिंडी अभियान’ कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन

पाचोरा – माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), यशदा (महाराष्ट्र शासन), युनिसेफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समृद्धजन फाऊंडेशन व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा तालुक्यात दि. 01 जून ते 05 जून 2026 दरम्यान ‘युवा जलदिंडी अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लहान वृक्षाला पाणी देऊन तहसीलदार मा. श्री. विजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ, मानद सचिव मा. श्री. दादासाहेब ॲड. महेश एस. देशमुख, व्हा. चेअरमन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी व जळगाव येथील माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा. श्री. अभिषेक चवरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले हे होते. विद्यार्थ्यांनी थेंब-थेंब पाणी वाचवून ‘जल ही जीवन है’ चा संदेश द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मा. डॉ. प्रवीण एन. महाले, माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा. श्री. अभिषेक चवरे, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, समृद्धजन फाऊंडेशनचे मा. श्री. कमलेश सोनवणे, महाराष्ट्र शासनाच्या यशदा प्रशिक्षण संस्थेचे मास्टर ट्रेनर मा. श्री. नितीन नेरकर यांनी मार्गदर्शन करताना पाण्याचे महत्त्व सांगितले. पाणी हे फक्त जीवनाचा आधार नसून कृषी आणि अन्नाची गरज आहे. तर पाणी परिसंस्था, जैवविविधता, आर्थिक विकास, उद्योग, स्वच्छता, आरोग्य, सांस्कृतिक व आध्यात्मिक अशा क्षेत्रांची गरज आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी या अभियानाला सर्वोतोपरी मदत करणार असणारे सामाजिक कार्यकर्ते व सारोळा बु. चे ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. अविनाश एम. देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. गणेश पाटील यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या ‘युवा जलदिंडी अभियाना’च्या कार्यक्रमादरम्यान 01 जून जारगाव, 02 जून निंभोरा व वानेगाव, 03 जून वाघुलखेडा व सारोळा बु., 04 जून डोंगरगाव, खडकदेवळा खुर्द व खडकदेवळा बु. तर 05 जूनला महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून या अभियानाची सांगता करण्यात येणार आहे. या अभियानात विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयांचे 30 स्वयंसेवक-स्वयंसेविका सहभागी होऊन घरोघरी जाऊन पर्यावरण संरक्षणाबाबत संवाद, पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश, श्रमदान, वृक्षारोपण व बाईक रॅलीद्वारे घोषणांसह सामाजिक संदेश या उपक्रमांद्वारे जनजागृती करणार आहेत.
यावेळी कार्यक्रमाला प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती व्ही. सोनवणे, प्रा. अतुल एस. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, डॉ. माणिक पी. पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील वाय. भोसले, प्रा. अमित एस. गायकवाड, डॉ. सरोज अग्रवाल, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. जयश्री महाजन, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. बी. जे. पवार व 90 स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती सोनवणे तर आभार प्रा. डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



