संत नरहरी महाराज नागरी सह. पतसंस्था, पाचोरा. या संस्थेला केंद्रीय सहकार मंत्रालया तर्फे “उत्कृष्ट संस्था” पुरस्कार जाहीर

पाचोरा – पाचोरा येथे गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीरित्या वाटचाल करत असलेली सुवर्णंकार समाजाच्या माध्यमातून चालवलेली संत नरहरी पतसंस्थेची केंद्रीय सहकार मंत्रालया तर्फे “उत्कृष्ट संस्था” म्हणून निवड करण्यात आली असून केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या NCD पोर्टल वर सदर संस्थेचे दरमहिन्याला अपलोड होत असलेल्या आर्थिक पत्रकावरून मार्क व रँकिंग वरून हया संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दि ६ जुलै २०२६ रोजी सहकार दिनी दिल्ली येथे केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे. पाचोरा गावाच्या इतिहासात प्रथमच हा मान या संस्थेला मिळाला आहे. सदर बाब गाव व तालुक्यासाठी साठी गौरवस्पद ठरलेली आहे.
सहकार क्षेत्रात या संस्थेने अचूक व्यवस्थापन करत
*25वर्ष सतत 0% थकबाकी
*25वर्ष सतत 0% NPA
*25 वर्षांपासून सतत “अ” ऑडिट वर्ग
*25 वर्षांपासून सतत नफयात
*25 वर्षांपासून आज पर्यंत निवडणूक नाही.
*25 वर्षांपासून संचालक भत्ता, अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली एकही रुपया खर्च नाही.
*25 वर्षात एकही कोर्ट केस, litigation, वसुली कारवाई करण्याचा खर्च नावे नाही.असे सहकार क्षेत्रात अशक्य वाटणारे norms संस्थेने प्रस्थापित केलेले आहे.
संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या वास्तूत आपला कारभार चालू असून संस्थेने 20 एप्रिल 2026 रोजी आपला रजत महोत्सव भव्य प्रमाणात साजरा केला होता. त्या रजत महोत्सवा निमित्त सर्व सभासदाना भेट वस्तूचे वाटप करून संस्थेच्या भरभक्कम आर्थिक स्थितीची जाणीव सभासदांना करून देण्यात दिली होती. आणि याच रजत महोत्सवी वर्षात संस्थेला केंद्र सरकारचा “उत्कृष्ट संस्था ” पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या सभासदांना संचालक मंडळाने आनंदाचा उपहार दिला आहे.
संस्थेचा कारभार चेअरमन विष्णू महादू सोनार व व्हा. चेअरमन नाना देवरे पाहत असून संचालक म्हणून मनोहर सोनार,वासुदेव जडे विनायक सराफ, ऍड. मदन मोरे, कालिदास सोनवणे, सौ.संगीता नंदकुमार सोनार,सौ.हर्षाली दत्तात्रय जडे.ऍड एम बी मराठा, अतुल करनसिंग राजपूत हे काम पहात आहे. तसेच मॅनेजर श्रीपाल गौड, कॅशियर विवेक कानडे यांचे कामकाज देखील स्तुत्य आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



