पाचोरा पोलिसांची तात्काळ कारवाई. दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद.

पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना सूचना दिल्या होत्या.दिनांक 12 जून 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजता, सातगाव डोंगरी येथील रहिवासी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर आणि दोन अनोळखी इसमांनी पाचोरा येथील लक्ष्मी अंगण कॉलनीत राहणाऱ्या सौ. कुसुम एकनाथ मोकळे यांच्या घरी “ॲमेझॉनचे पार्सल आले आहे” असे खोटे सांगून प्रवेश केला. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या दोन मुली व मुलाला खाटेवर बसवून खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवला. “सोन्याच्या चिपा लवकर काढून द्या, नाहीतर तुमचे खरे नाही” अशी धमकी देत घरातील कपाटातून सात हजार रुपये आणि मुलाच्या गल्ल्यातील सातशे रुपये असा एकूण 7,700 रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले.याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 299 /2026, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.दिनांक 13 जून 2026 रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर, वय 21, रा. सातगाव डोंगरी याला अटक केली. तपासात त्याचा मामा गोकुळ महादु वाघ पाटील, वय 37, याचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच तिसरा आरोपी योगेश परशराम शिंदे, वय 31, रा. नाशिक याच्याकडून चोरीस गेलेली 7,700 रुपयांची रक्कम व खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले.तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी गोकुळ वाघ याला फिर्यादीच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती होती. त्याने नितीन पाटील, रा. पाचोरा याला माहिती देऊन चोरीचा कट रचला. नितीन पाटीलने त्याच्या ओळखीचे दोन इसम बोलावून चेतन भुतेकरसह जबरी चोरी केली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, विलास पाटील, योगेश पाटील, हरिष परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी, नितीन भालेराव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवळ करीत आहेत.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



