भडगाव येथील बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीतील पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद “

जळगांव – दि.10/07/2026 रोजी फिर्यादी यश हिरामण हटकर यांनी फिर्याद दिली कि यांच्याकडील सुमारे ₹51,560/- रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली. याप्रकरणी फिर्यादी यश हिरेमण हटकर रा. शिवनेरी गेट, भडगाव, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्र. 227/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3 ( 5 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सदर गुन्हयातील आरोपी क्र. 1) उदय छोटू गायकवाड, रा. अनकवाडी ता. जि. धुळे हा भारत फायनान्स कंपनी, भडगांव या कंपनीत कामास होता. त्यामुळे त्यास सदर फायनान्स कंपनीतून दैनंदिन जमा होणारी रक्कम कोण किती वाजता घेवून जातो याबाबत त्यास चांगले प्रकारे माहिती होती. त्यामुळे ) उदय छोटू गायकवाड, वास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतले असता त्याने नमुद गुन्हयांची कबुली देवून सांगितले की, त्याचे साथीदार 2) अनिल दिलीप पाटील, वय 31, रा. पळासखेडा ता. भडगांव 3) विशाल मधुकर गांगुर्डे (वय 26 वर्ष) रा. पुर्वीपाडा ता. जि. धुळे, 4) निलेश अण्णा पवार (वय 20 वर्षे) रा. अनकवाडी ता. जि. धुळे, 5) योगेश प्रकाश पवार (वय 22 वर्षे) रा. अनकवाडी ता. जि. धुळे, 6) सागर हिम्मत पाटील, रा. पळासखेडा ता. भडगांव (फरार), 7) हर्षल चांगदेव अहिरे, रा. येवला (फरार) अशांनी भारत फायनान्स कंपनीतून पैसे घेवून जाणाऱ्या इसमा जवळील पैसे हिसकाविण्याचा कट रचला. त्या प्रमाणे दि. 09/07/2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजता भडगांव येथे वेगवेगळया मोटार सायकलने आले. त्यानंतर 1) अनिल दिलीप पाटील, वय 31, रा. पळासखेडा ता. भडगांव, 2) विशाल मधुकर गांगुर्डे, वय 26, रा. पुर्वीपाडा ता. जि. धुळे, 3) हर्षल चांगदेव अहिरे, रा. येवला ता. येवला जि. नाशिक हे हर्षल अहिरे यांचे मोटार सायकलवर तिन सिट बसून पैसे घेवून येणाऱ्याचे बॅग हिसकावून घेण्या बाबत सांगितले. त्यानंतर 4) निलेश आण्णा पवार, वय 20, रा. अनकवाडी ता. जि. धुळे, 5) सागर हिम्मत पाटील रा. पळासखेडा ता. भडगांव जि. जळगांव हे दुसऱ्या मोटार सायकलवर त्याचे सोबत त्याचेवर पाळत ठेवण्यासाठी त्याचे मागे पुढे चालणार, आरोपी क्र. 1 व 5 असे दुसऱ्या मोटार सायकलवर भडगांव ते कजगांव रोडवर थांबले. तेथून इतर आरोपीतांशी आरोपी क्र. 1 हा वेळोवेळी संपर्क करीत होता. तेथून सदर घटना केल्यानंतर सदर आरोपी आप आपल्या घरी निघून गेले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासा दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक आरोपी :-
- उदय छोटे गायकवाड (वय 22 वर्षे) रा. अनकवाडी ता. जि. धुळे 2. अनिल दिलीप पाटील (वय 31 वर्षे) रा. पळासखेडा ता. भडगांव. 3. विशाल मधुकर गांगुर्डे (वय 26 वर्षे) रा. पुर्वीपाडा ता. जि. धुळे 4. निलेश अण्णा पवार (वय 20 वर्ष) रा. अनकवाडी ता. जि. धुळे योगेश प्रकाश पवार (वय 22 वर्षे) रा अनकवाडी ता जि धुळे
जप्त मुद्देमाल :-
- 25,000/- रु. किमतीची 01 मोटार सायकल.
सदर गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशन करीत आहे. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ, श्री. विजयकुमार ठाकुरवाडा, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग, चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पो.उप निरी. सोपान गोरे, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना. राहुल पाटील, पोकॉ. ईश्वर पाटील, पोकॉ. जितेंद्र पाटील, पोकॉ. भूषण पाटील व चापोकॉ. रिजवान शेख यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीकामी भडगावं पो.स्टे. हजर करण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास हा म.पो.उप निरी. लक्ष्मी करंकार ह्या करीत आहेत. सदर गुन्हयास भा.न्या.सं.क. 310 (1) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



