स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक अमोल बनकर यांचा स्तुत्य उपक्रम; तारखेडा बुद्रुक मधील 97 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पाचोरा (तारखेडा बुद्रुक) – देश सेवे बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे उदाहरण देत भारतीय सैन्य दलातील जवान श्री. अमोल गोविंदा बनकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तारखेडा बुद्रुक येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. कै. गोविंदा ओंकार बनकर यांच्या स्मरणार्थ आयोजित या उपक्रमात एकूण 97 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालय, तारखेडा बुद्रुक येथे झालेल्या या कार्यक्रमात वसतिगृहातील 35 विद्यार्थ्यांना पंखे, वह्या, पेन, पेन्सिल, किटबॉक्स आणि बिस्कीट पुडे देण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद शाळेतील 62 विद्यार्थ्यांना ड्रॉईंग बुक, कलर बॉक्स, पेन, पेन्सिल, किटबॉक्स आणि बिस्कीट पुडे शैक्षणिक साहित्य म्हणून भेट देण्यात आले.
उपस्थित मान्यवर व सहकार्य
या उपक्रमासाठी अरुण ओंकार बनकर, अमोल गोविंदा बनकर, समाधान बापू बनकर, किरण गोविंदा बनकर, प्रवीण संजय बनकर, प्रथम अरुण बनकर यांच्यासह समस्त मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. आर. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र दगडू पाटील, सरपंच देवा पाटील, माजी सरपंच विकास मुकुंदा पाटील, वसंत झिपरू वाघ, माजी सरपंच अरुण बाबूलाल पाटील, दिलीप वसंत पाटील, रवींद्र कौतिक चव्हाण, पोलीस पाटील, डॉ. बापू सुखदेव चव्हाण, धनराज विक्रम पाटील, देवचंद संतोष कोळी, संजय काशिनाथ पाटील, शरद नामदेव पाटील, माजी सैनिक विठ्ठल पाटील, माजी सैनिक प्रमोद पाटील, योगेश दादा चिंचखेडा, राहुल दादा चिंचखेडा, शांताराम तुकाराम पाटील, रवींद्र संतोष कोळी, बापू दत्तू पाटील, बालू सिताराम पाटील, पिंटू एकनाथ मराठे, भिका अण्णा मास्तर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र बाविस्कर सर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बडगुजर सर व शिक्षक स्टाफ यांनी देखील विशेष परिश्रम घेतले.
प्रेरणादायी संदेश
सीमेवर देशाची सेवा करत असतानाही गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याच्या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. “देशसेवेसोबत समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार” या संदेशामुळे स्वातंत्र्य दिन अधिक अर्थपूर्ण झाला.
या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री. अमोल गोविंदा बनकर यांच्यासह सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे व तारखेडा बुद्रुक ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



