
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक : आमदार किशोर आप्पा पाटील
पाचोरा : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वानिमित्त पाचोरा परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना-युवा सेना, पाचोरा-भडगाव यांच्या वतीने पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले,
मा.श्री.बापु रोहम(पोलीस उपअधीक्षक, पाचोरा),
मा.श्री. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा),
मा.श्री. राहुल पवार( पोलीस निरीक्षक, पाचोरा) हे होते .मा. श्री. रावसाहेब पाटील (जिल्हाअध्यक्ष, शिवसेना),
मा. श्री. गणेश भिमराव पाटील( सभापती, कृ.उ.बा. समिती, पाचोरा-भडगांव), पाचोरा नगरपालिकेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, माजी नगराध्यक्ष मा.श्री. संजय गोहिल,मा.श्री. विनोद तावडे, मा.श्री. सुमित सावंत ,
मा.श्री. भोला पाटील श्री. सुनिल पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख) तसेच समन्वयक श्री. गजु पाटील । श्री. रविभाऊ पाटील (माजी नगरसेवक), राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी समर्पित केली, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचाही त्याग तितकाच मोठा आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन एक सक्षम, समृद्ध, स्वाभिमानी आणि विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प व्यक्त केला . भारतीय सैन्य दलात जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव येथील सैनिकांची संख्या सर्वात जास्त आहे याचा मला अभिमान आहे. लवकरच पाचोरा येथील हुतात्मा स्मारकाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलवुन स्वातंत्र्य संग्रामात तालुक्यातील हुतात्मा झालेल्या व ब्रिटिश सत्तेशी लढताना जखमी झालेल्या तसेच कैद झालेल्या अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा माहितीपट व भित्तीपट तयार करण्याचा संकल्प जाहीर केला. यासोबतच पाचोरा तालुक्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यसंगामातील योगदान यावर एक पुस्तक तयार करण्याचे देखील जाहीर केले. ज्यामुळे तालुक्याचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास तरुण व नागरिकांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील पाटील यांनी व्यक्त केला.
करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी पाचोरा तालुक्याचा स्वातंत्र्य पूर्व इतिहास व स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विषद केले. प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी नागरिकांनी विशेषता युवकांनी देशाप्रती आपली जबाबदारीही लक्षात ठेवली पाहिजे. युवकांनी शिक्षण, कौशल्य, विज्ञान,तंत्रज्ञान, उद्योग, क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देऊन भारताला अधिक सक्षम बनवावे तसेच हक्कासोबत कर्तव्याची देखील जाणीव ठेवावी अशा प्रकारचे आवाहन केले.
पोलीस उप-अधीक्षक श्री बापू रोहम यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व व रस्ता सुरक्षितता व स्वयंशिस्त याचे महत्त्व विषद केले तहसीलदार श्री विजय बनसोडे यांनी वर्षाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे भारतीय हीच आपली खरी ओळख आहे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले.
स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांच्या वतीने पत्रकार श्री. संदीप दामोदर महाजन यांनी आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेना यांचे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान केल्याबद्दल आभार मानले. श्री संदीप महाजन यांनी पाचोरा शहरातील स्वातंत्र चळवळीचा इतिहास सांगितला तसेच चले जाव आंदोलनातील स्वर्गीय सुपडू अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील आंदोलनाचा थरारक अनुभव सांगितला.
कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, शिवसेना नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजू पाटील , सूत्रसंचलन नाना वाघ आणि आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी केले.
या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा झाला सन्मान
१ )स्वर्गीय सुपडू भादू पाटील (पाचोरा येथील ऑगस्ट क्रांतीचे नेतृत्व)
२)हुतात्मा स्व.महादू चिंधा माळी
३) हुतात्मा स्व.छगन राजाराम लोहार
४)स्व.नथू महादू पाटील ५) स्व.लाभचंद जगजीवन राम शेठ
६)स्व. बाजीराव धुरसिंग पाटील
७)स्व. श्रीपत दलचंद तेली
८)स्व. बळीराम शिवराम शिंपी
९)स्व. बळीराम वेडू पाटील
१०)स्व.रामचंद्र खंडू जोशी
११)स्व . महादेव लाला पाटील
१२)स्व. लोटन सोनजी पाटील
१३)स्व. कपूरचंद मुथा
१४)स्व. उखर्डू मल्हारी पाटील
१५)स्व. जनार्दन बळवंत वाणी
१६)स्व. दामोदर लोटन महाजन
१७)स्व. सांडू गुलाबसिंग राजपूत
१८)स्व. राजाराम धनजी पाटील
१९)स्व. चंपकलाल रविशंकर मोदी
२०)स्व.महादू मोतीराम परदेशी
२१)पै. रोज महंमद शालम पठाण
२२)स्व. केशव पांडू शिंदे
२३)स्व. नागोशेट बारकू सोनार
२४) स्व. अमृत देवराम पाटील*
२५)स्व. जयवंतराव चिमणराव गरुड
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



