पाचोर्यात रोटरी व डॉक्टर्स तर्फे पहलगाम घटनेचा निषेध

पाचोरा – येथील पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे पहेलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या निमित्ताने आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता रोटरी व डॉक्टर्स संघटनेतर्फे शहरात शांती पदयात्रा काढून शासनाला निवेदन देण्यात आले. येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे आज तारीख 25 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांती पदयात्रा काढण्यात आला. पदयात्रे दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शांती पदयात्रा थांबवण्यात आली. या ठिकाणी 22 एप्रिल रोजी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना मेणबत्त्या प्रज्वलित करून व शांती मंत्राचे पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाचोरा प्रांताधिकारी कार्यालय पाचोरा , पोलीस ठाणे व तहसील कार्यालय पाचोरा येथे रोटरी व डॉक्टर असोसिएशन तर्फे पहलगाम घटनेचा निषेध नोंदवणारे निवेदन संयुक्तपणे देण्यात आले.
निष्पाप पर्यटकांना ठार मारणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी व भारताकडे वाकडी नजर करणाऱ्या पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगीपाचोरा रोटरी क्लब व डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सचिव डॉ. शिवाजी शिंदे, चेअरमन डॉ. जाकीर देशमुख, डॉ अजयसिंग परदेशी, डॉ. मुकेश राठोड, डॉ.अमोल जाधव, डॉ. संजय जाधव, डॉ. सुनिल पाटील, डॉ. संगिता पाटील,अरुणा उदावंत, पिंकी जीनोदीया, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. अनिल झंवर, डॉ. भरत बापू पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ अनिल पाटील, डॉ जिवन पाटील, डॉ. नरेश गंवदे, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. मुकेश तेली, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. चेतन राजपुत, डॉ, स्वप्निल पाटील, डॉ.अतुल महाजन, डॉ. किशोर पाटील, चंद्रकांत लोढाया,भरत सीनकर, निलेश कोटेचा, डॉ. जीवन पाटील, डॉ. राहुल काटकर, डॉ. विजय जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. राहुल झैरवाल, डॉ. आनंद जैन, डॉ मुकेश पाटील, डॉ. पंकज हरणे, डॉ. तौसिफ खान डॉक्टर विशाल पाटील, डॉ. सिद्धांत तेली, भारतीय ग्राहक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदी रोटरी व डॉक्टर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा


