यशस्वी सापळा कारवाई
सरपांचा सह पंटर लाच घेताना रंगेहाथ पकडले पाचोरा – येथून जवळच असलेले खडकदेवला येथील सरपंच अनिल विश्राम पाटील व त्याचा हस्तक दहा हजराची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या कारवाईत सापडले असून पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते. तक्रारदार यांना घर कुल मंजूर झाले. होते त्यांना गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावणे साठी काम करून देतो म्हणून दहा हजाराची मागणी केली होती परंतु तक्रारदार यांनी सदर बाबत तक्रार ही अँटी करप्शन,विभाग जळगाव यांचे दिली असता सदर सापळा लावून आरोपीस पकडण्यात आले.
तक्रारदार- पुरुष,वय-40 रा. खडकदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव तर आलोसे क्र.1)अनिल विश्राम पाटील वय 46 वर्षे,व्यवसाय सरपंच खडकदेवळा बुद्रुक ता. पाचोरा 2. बलराम हेमराज भिल, वय 46 वर्षे खाजगी इसम रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा
यातील तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते . परंतु तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी सदरचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे क्र.1 यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात 10000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम आलोसे क्रं .2 यांच्याकडे देण्यास सांगितले. आलोसे क्र.2 यांना दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा पर्यवेक्षक अधिकारी
श्री. योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव
मो.न.9702433131
▶️ *सापळा व तपास अधिकारी
स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक लाप्रवि जळगांव
▶️ सापळा पथक
Psi दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने
▶️ *कारवाई मदत पथक-
नैत्रा जाधव, पोलीस निरीक्षक
पोहेकॉ,रविंद्र घुगे,सुनिल वानखेडे शैला धनगर, पोना किशोर महाजन , बाळू मराठे , पोकॉ ,प्रणेश ठाकुर,
अमोल सुर्यवंशी
▶️ *मार्गदर्शक-*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
*3) श्री .स्वप्नील राजपूत वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9403234142
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
*@ मोबा.क्रं. 9702433131@ टोल फ्रि क्रं. 1064
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377