आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्राईम,आर्थिक गुन्हेमहाराष्ट्र
Trending

पाचोरा पोलीसांची कामगिरी मोबाईल चोरटे पकडले

पाचोरा पोलीस स्टेशनचे डी.बी. अंमलदार यांनी दोन आरोपी यांना अटक करुन गुन्हयात चोरीस गेलेला मुददेमाल हस्तगत केला

पाचोरा , दि -१८- दिनांक १७/०५/२०२४ रोजी दुपारी १४.३० वा. चे पुर्वी फिर्यादी नामे श्रीराम रेवननाथ जोशी, वय. ४० वर्षे, धंदा. वृत्तपत्र विक्रेता, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर हे पाचोरा बस स्थानक येथुन पाचोरा ते सुरत अशा बसने धुळे येथे जात असतांना सदर बसमध्ये त्यांचे खिशातून कोणीतरी पॅन्टचे खिशातून त्यांचा मोबाईल चोरुन नेला. तसेच ते बसचे खाली उतरुन मोबाईल शोधत असतांना साक्षीदार नामे १. तारकेश राजेंद्र पाटील, रा. गजानन नगर, जळगांव २. शंतनु प्रकाश भालेराव, रा. कु-हाड, ता. पाचोरा असे यांचे एकुण ०३ मोबाईल एकुण ३२,०००/- रुपये किंमतीचे बसस्थानक परिसरातुन चोरीस गेले बाबत पाचोरा पोलीस ठाणेस गु.रजि.क्रमांक २४०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे फिर्याद दिनांक १७/०५/२०२४ रोजी १७.४२ वा. दिली होती.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे डी.बी. अंमलदार पोहेकॉ/६२५ राहुल शिंपी, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१९९७ योगेश अरुण पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्हयाचा तपास चालु असतांना संशयीत इसम हे बसस्थानक परीसरात एका रिक्षात असुन फिरत आहे अशी गुप्त महिती बातमीदाराने पोहेकॉ/६२५ राहुल शिंपी यांना बातमी दिल्याने बातमीप्रमाणे त्यांना जारगांव चौफुलीचे पुढे, रोडचे डावे बाजुला आरोपी नामे १. नाजीम मोहम्मद पठाण, वय. ३२ वर्षे, रा. राजमालती नगर, रुम नं. १०, विकास डेअरी जवळ, दुध फेडरेशन जवळ, जळगांव २. अमजद रशीद शेख, वय. ३३ वर्षे, रा. गयबी नगर, फलॅट नंबर २०२, महेमुद अपार्टमेंट, गुलजार नगर, भिवंडी, जि. ठाणे हे रिक्षा क्रमांक एम.एच.-१९, सी. .डब्लु.-११४२ हिचेत बसले होते. सदर आरोपींचे अंगझडतीत एकुण ०३ मोबाईल ३२,०००/- रुपये किंमतीचे मिळुन आल्याने त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांची गुन्हयाचे संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन चोरीस गेलेले मोबाईल हे जप्त करुन त्यांनी सदर गुन्हयात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आलेली असुन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.


सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक सोा, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, प्रभारी अधिकारी, पाचोरा पोलीस स्टेशन, पोहेकॉ/६२५ राहुल शिंपी, पोहेकॉ/२४०९ विश्वास देशमुख, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१९९७ योगेश अरुण पाटील, पोकॉ/७८५ संतोष सुरेश राजपुत यांनी पार पाडली आहे

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\