आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा नगरपरिषदेचा रुपये 210.32 कोटीचा सन 2026-27 आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर

पाचोरा नगरपालिकेचा यावर्षी करवाढ नसलेला अंदाजपत्रक सादर करण्यात आला. शुक्रवार दिनांक 27/02/2026 रोजी पाचोरा नगरपरिषदेच्या विशेष सभेत 210.32 कोटी रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सभेने आठ लक्ष रुपयाचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर केलेले आहे. तथापि केलेल्या तरतुदींवरील होणारा खर्च विचारात घेता व नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने अनावश्यक खर्च कपात करणे खर्चात काटकसर करणे व नगरपालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच पाचोरा शहराच्या विकासाच्या दुरुष्टीने महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (रास्ते प्रकल्प), महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (भुयार गटार), अमृत 2.0 प्रकल्प येत्या आर्थिक वर्षात राबविण्यात येणार आहे.

यादरम्यान सन 2026- 2027 करिता कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ सुनिता किशोरआप्पा पाटील होत्या. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी श्री. अमोल कुमावत यांनी अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. यावेळी पाचोरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री किशोर बारवकर, शिवसेना गटनेता श्री सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता श्री सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियंका पाटील, सभापती मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरपरिषद नगरसेवक व नगरसेविका व सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!