आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
ताज्या बातम्या

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला बळ ; राहुल संघवी यांचा शिवसेनेत प्रवेश, सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा, दि. १७ ऑक्टोबर : पाचोरा येथील प्रतिष्ठित व्यापारी, पीपल्स बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल अशोक संघवी व त्यांचे बंधू कल्पेश संघवी यांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

काल दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पाचोरा येथे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार पाटील यांनी राहुल संघवी यांचे पक्षात स्वागत करताना, “शिवसेनेत एक अभ्यासू, सुपरिचित व प्रतिष्ठित व्यापारी आल्याने संघटनेत एका रत्नाची भर पडली आहे,” असे गौरवोद्गार काढले.

राहुल संघवी पक्षप्रवेश करताना

राहुल संघवी यांच्या प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे बळ आणखी वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. गणेश भिमराव पाटील यांनी समितीच्या दालनात राहुल संघवी आणि कल्पेश संघवी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.

यावेळी बोलताना सभापती गणेश पाटील म्हणाले, “भविष्यात एकत्रितपणे बाजार समितीचा सर्वांगीण विकास साधणार असून, यासाठी शेतकरी, अडते-व्यापारी, हमाल-मापाडी व इतर सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू.”

या सत्कार सोहळ्याप्रसंगी बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, मनोज सिसोदिया, राहुल पाटील, प्रकाश तांबे, शालीग्राम मालकर, युसुफ पटेल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन येवले, श्री. अग्रवाल, बाजार समितीचे सचिव बोरुडे साहेब, प्रतिक ब्राह्मणे यांच्यासह सर्व आस्थापना कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहून उभयतांचे स्वागत करीत शुभेच्छा देत होते.

व्यापरी असो. अध्यक्ष सचिन येवले

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!