आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा येथे दीपावली निमित्ताने रंगला दोस्तांच्या गप्पांचा फड

पाचोरा, दि 9 – साला बाद प्रमाणे पाचोरा येथे दीपावली निमित्ताने बाहेर गावी नोकरी वा व्यापार उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील रहिवासी व शालेय शिक्षण सोबत घेतलेल्या मित्रांचा छोटे खाणी स्नेह मेळावा तथा न्याहारी मेळावाच पाचोरा येथे भरत असतो.

शेतकरी, उद्योजक,व्यापारी नोकरदार आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व वर्ग मित्र दीपावलीच्या या पावन मुहूर्तावर एकत्रित येऊन वर्षभरात झालेल्या घडामोडींचा उहापोह करीत असतात. शालेय जीवनातील आठवणी, गमती – जमती, आनंदाचे क्षण सर्व मित्र यावेळी आपल्या समूहात व्यक्त करत असतात वेळोवेळी आलेल्या सुख – दुःखाच्या गोष्टींना एकत्रित येऊन मार्ग काढत असतात.
साला बाद प्रमाणे येणाऱ्या या सणाच्या वेळी सगळे मित्र एकत्रित येऊन धमाल मज्जा करतात जीवनाचे अनेक टेन्शन विसरून जाऊन थोडा काळ का होईना पण आपल्या जिवलग मित्रांन सोबत वेळ घालवून पुढील वर्षाची ऊर्जा ते संचित करून घेतात अशा या पाचोरा येथील 93 बॅच ग्रुपमेट समूहाला नक्कीच मानाचा मुजरा करावा तो कमीच भासतो
यांना पुढील काळातही हा मैत्रीचा गोडवा आणि हा स्नेह मेळावा सतत राहो याच सदिच्छा देऊन यांची मैत्रीची बाग सदाबहार फुलत राहो हीच प्रार्थना.

संजय पाटील,दिनेश पाटील उमेश राऊत,प्रकाश मिश्रा,सुनील शामनानी, किशोर पाटील,सतीश देशमुख,सचिन वाबळे,महेश राजपूत,सचिन भोसले, यांसह अनेक 93 बॅच ग्रुप मित्र परिवार यांनी दिवाळी निमित्ताने फराळाचा आस्वाद घेत आपल्या बाल पणातील आठवणींनी उजाळा देत दीपावली पर्वाच्या शुभेच्छा देत हा आनंद पर्व मोठया उत्साहात साजरा केला

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!