पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लाॅयर्स असोशीएशन तर्फे माहात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती पाचोरा न्यायालयात उत्साहातसाजरी.

पाचोरा, दि.14 – दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे आज पाचोरा दिवाणी न्यायालयात महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी केली गेली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष सरकारी वकील सौ. मीना सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे साहेब, पाचोरा प्रांत अधिकारी श्री भुषण अहीरे, दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन अध्यक्ष ॲड. अभय पाटील, ॲड. बापु सैदाणे, ॲड. एस पी पाटील ॲड. अण्णासाहेब देशमुख, उपाध्यक्ष रवींद्र ब्राह्मणे , सचिव सुनील सोनवणे. अँड.अंकुश कटारे, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. मुबारक पठाण, ॲड. करूणाकर ब्राम्हणे हे होते. यावेळी न्यायमुर्ती श्री. निमसे साहेब, ॲड. एस. पी. पाटील, ॲड. बापु सैदाणे, ॲड. अनिल पाटील, चिमुकला वक्ता चि. सनी, ॲड. मीना सोनवणे यांनी बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातील विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेब व शिवराय याच्या प्रतीमेसह प्रबोधनकार ठाकरे यांच्या, “देवळाचा धर्म आणी धर्माची देवळे” या पुस्तकातचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहारा नंतर सर्व वकील बांधव यांनी बाईक रॅली काढुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
पाचोरा न्यायालयात स्थापनेपासून आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांची जयंती साजरी केली जात नव्हती त्याची सुरुवात आज पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व वकील बांधवांनी एकत्र येऊन केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. अंकुश कटारे, ॲड. मुबारक पठाण, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. रविद्र ब्राम्हणे, ॲड. सुनील सोनवणे पदाधिकारी यांनी अध्यक्ष ॲड. अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीश्रम केले. कार्यक्रमाला ॲड. रणसिग राजपुत, ॲड. बापुसाहेब सैदाणे, ॲड. रवी राजपुत, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. मानसिगं सिध्दु, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड. रोशन, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. गोपाल पाटील , ॲड. अविनाश सुतार, ललित सुतार, ॲड. राजेंद्र वासवानी, ॲड. पवन अहीरे, ॲड. रोहीत ब्राह्मणे, ॲड. अमोल म्हस्के ॲड. रणजीत तडवी, ॲड. तुषार नैनाव या वकील बांधवांसह पाचोरा न्यायालयातील केस वॉच पो. हवलदार दिपक पाटील व विकास पाटील. न्यायालयातील कर्मचारी रवी पाटील याच्यासह ईतर वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथे रांगोळी काढण्यासाठी आवर्जून आलेल्या सुवर्णाताई पाटील यानी सुंदर अशी रांगोळी सजावट केली, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाटील यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट भाग्यश्री महाजन यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



