महाराजा अग्रसेन जयंती निमित्त बाजार समिती तर्फे शोभायात्रेस फराळ वाटप व स्वागतोत्सव.
पाचोरा, दि.15 – श्री श्री 1008 महाराजा अग्रसेन जयंती निमित्ताने पाचोरा येथे दिनांक 15/10/2023 रोजी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील , मा.नगारध्यक्ष छोटू गोहिल, मा.उप न.शरद पाटे ,बंडू चौधरी ,संचालक सुनीलआबा पाटील ,राहुल पाटील ,मनोज सिसोदिया ,सचिव बि बी बोरुडे , राजेश पाटील स्विय.सहा.(आमदार)यांच्यासह मार्केट मधील व्यापारी बांधव ,समितीचे कर्मचारी ,प्रतिष्ठित नागरिक यांनी अग्रवाल समाजाच्या निघालेल्या शोभायात्रेस फराळ करीत पालखीचे स्वागत केले.
यावेळी युवा नेते सुमित किशोरआप्पा पाटील, सभापती गणेश पाटील यांनी महाराजा अग्रसेन यांना पुष्पहार अर्पण करीत सर्व अग्रवाल बांधवांचे या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत स्वागत केले.
यावेळी फराळ वाटपाचा कार्यक्रम होऊन शोभायात्रेतील नव युवकांसोबत युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला त्यामुळे नवतरुणांमध्ये चैतन्य संचारलेले पहावयास मिळाले
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ व कर्मचारी यांनी यावेळी शोभायात्रेतील समाज बांधवांना ही सेवा देत एक नवीन आदर्श निर्माण केल्याचे पहावयास मिळाले.
सालाबाद प्रमाणे या शोभायात्रेचे आयोजन होत असून यात अग्रवाल समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवताना दिसत आहे त्यांचे कार्य एवढ्यावरच न थांबता समाज उपयोगी विविध उपक्रम, गरजवंतांना मदत तसेच निराधार असलेल्यांना अन्न व वस्त्र आदीबाबत मदत हे बांधव करताना कायम निदर्शनास येत असतात.
शोभायात्रेत शहराचे सर्व अग्रवाल समाज बांधव व भगिणी यांच्यासह शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. शोभेयात्रेतील सामील सर्व भाविकांसाठी फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आल्यामूळे आयोजकांचे यावेळी समाज बांधवांकडून कौतुक करण्यात आले. सर्व समाज बांधव आणि नागरिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा सभापाती व संचालक मंडळ, सुमित किशोर आप्पा पाटील यांनी दिल्या.तर बाजार समितीचे कर्मचारी यांनी यावेळी सहकार्य केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377