भव्य मोफत राज्यस्तरीय अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर

पाचोरा – पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ संचलित संस्थेतर्फे दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये येत्या 5 मे ते 15 मे पर्यंत वारकरी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हा खूप प्रगती करत आहे यांत्रिकदृष्ट्या माणूस हा खूप पुढारलेला असला तरी आपल्या परिवारातील लेकरांना वेळ देण्यात आणि संस्कार देण्यात कुठेतरी अपूर्ण पडत आहे आज मुले मोबाईल ,संगणक, लॅपटॉप च्या आहारी गेले आहेत आई-वडिलां शिवाय मुलं राहू शकतात परंतु मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत आणि त्यामुळे मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागलीत चिडचिड करायला लागतात व तसेच आई-वडिलां पासून लांब व्हायला लागले आहेत आणि त्यासाठी मुलांना खरी गरज आहे ती संस्कारांची आणि हीच बाब लक्षात ठेवून आपल्या पाचोरा शहरातील भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगाव कर व अनाथांची माय ह भ प सुनीताताई पाटील हे दोघ पती-पत्नी गेल्या सहा वर्षांपासून भव्य दिव्य स्वरूपामध्ये बाल संस्कार शिबिराचे आयोजन करतात
सदर शिबिरामध्ये मुलांना सकाळी पाच वाजेपासून मुलांचा दिनक्रम सुरू होतो सकाळी ५ ते ६ योगासन स्नान संध्या तसेच ६ ते ७ गीता पाठ व विष्णुसहस्रनाम ८ ते ९ अल्पोपहार ९ ते १० रामरक्षा स्तोत्र तथा संगीत भजन १० ते १२ विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन व बारा ते एक जेवण १ ते ३ आराम ३ ते ५ परत संवाद कौशल्य संभाषण कौशल्य व्यक्तिमत्व विकास आधी करून विषयांवर मार्गदर्शन ५ ते ६ दणदणीत हरिपाठ तसेच पावली खेळणे ६ ते ७ मृदुंग व हार्मोनियम मार्गदर्शन सात ते आठ जेवण ८ ते ९ दिवसभर केलेल्या अभ्यासाची रिविजन व रात्री नऊला झोपणे असा दिनक्रम असतो
सदर शिबिरामध्ये दोन वेळ उत्कृष्ट जेवण सकाळी नाष्टा दुपारून शीतपेय यांचे नियोजन असून प्रत्येक मुलाला गीता हरिपाठ हनुमान चालीसा रामरक्षा विष्णुसहस्रनाम आदी करून धार्मिक पुस्तके भेट देण्यात येतील व तसेच शेवटच्या दिवशी सहभागी प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे सदर शिबिराचे आयोजन हे शक्तीधाम स्वप्नशिल्प हॉटेल समोर भडगाव रोड पाचोरा येथे करण्यात आले असून आदरणीय श्री रमेश जी मोर साहेब यांचे अनमोल असे सहकार्य लाभले आहे
या शिबिरामध्ये आपल्या नववर्षापुढील मुलांना पाठवून मुलांना संस्कारक्षम बनवण्यामध्ये आपण आमचे सहकार्य करावे असे आवाहन योगेश जी महाराज व सुनीता ताई यांनी केले आहे.लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे वर्षभर 60 अनाथ मुलांचे सांभाळ देखील करण्यात येते जर आपल्या परिसरामध्ये कोणी आई-वडील नसलेले अनाथ मुले असतील तर त्यांना देखील संस्थेमध्ये पाठवावे असे आवाहन केले जाते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



