रामेश्वरम, तामिळनाडू येथे IGNITE INDIA 2026 – भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त रामेश्वरम येथे भव्य STEM महोत्सव.

रामेश्वरम -भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 11व्या स्मृतीदिनानिमित्त ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन (AKIF), हाऊस ऑफ कलाम , रामेश्वरम यांच्या वतीने “IGNITE INDIA 2026 – एक भव्य STEM महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन आणि युवकांमध्ये नवोपक्रम वाढवण्याच्या ध्येयासाठी विविध कार्यक्रम राबवते.
हा राष्ट्रीय कार्यक्रम 27 जुलै 2026, सोमवार रोजी गोस्वामी मठम 2, राम तीर्थमजवळ, रामेश्वरम, तामिळनाडू येथे सकाळी 10:00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.विज्ञान, नवोपक्रम आणि युवाशक्तीला प्रोत्साहन देण्याच्या डॉ. कलाम यांच्या स्वप्नाला अभिवादन म्हणून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी STEM प्रकल्प सादर करणारस्पर्धा व मूल्यांकन प्रक्रियाप्रत्येक संस्थेने अंतर्गत STEM स्पर्धा घेऊन सर्वोत्तम तीन प्रकल्प/कल्पना/मॉडेल निवडून पाठवावेत.सर्वोत्तम तीन विजेत्यांना AKIF तर्फे प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाईल इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल .
24 जुलै 2026 पर्यंत सहभागाची पुष्टी व शिक्षक समन्वयकाची माहिती सादर करणे . सकाळी 10:30 वाजेपूर्वी : STEM मॉडेल्स निश्चित जागी लावणे . 10:30 – 11:00 : परीक्षकांद्वारे मूल्यांकन व पुरस्कारासाठी सर्वोत्तम प्रकल्पांची निवड11:00 – 11:30 : चहापान दुपारी 12:00 पासून : पुष्पांजली, स्मृती व्याख्यान, मान्यवरांची भाषणे आणि बक्षीस वितरण दुपारी 1:30 : कार्यक्रमाची सांगता. दुपारच्या जेवणाची व्यवस्था 25 जुलै 2026 पर्यंत कळवण्यात येईल
सहभाग विनामूल्य असून प्रवास आणि निवास खर्च स्वतः करावा लागेल असे आयोजक श्री एपीजेएमजे शेख सलीम ( कलाम सर यांचे नातू आणि संस्थेचे फाऊंडर ट्रस्टी ) कळवत आहे,
संपर्कासाठी +91 91671 28905 ईमेल : contact@houseofkalam.org , श्री एपीजेएमजे शेख सलीम ( डॉ कलांम यांचे नातू )

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



