अवयवदान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पाचोऱ्याच्या उन्नती पाटीलचा प्रथम क्रमांक.

पाचोरा :- अवयवदान दिनानिमित्त ऑर्गन फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पाचोरा येथील कला छंद आर्ट क्लासची विद्यार्थिनी कु. उन्नती नितीन पाटील हिने उत्कृष्ट कलाकृतीच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावत ₹१०,००० रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळविले आहे.
अवयवदाना सारख्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर उन्नतीने साकारलेल्या प्रभावी व कल्पक पोस्टरने परीक्षकांची विशेष दाद मिळवली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे. या यशामागे निर्मल इंटरनेशनल स्कूल येथील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी (कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लास, पाचोरा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव, सर्जनशील विचार आणि मेहनतीच्या जोरावर उन्नतीने हे यश संपादन केले.कु. उन्नती ही पाचोरा येथील गजानन डेअरीचे संचालक श्री. नितीन पाटील यांची कन्या असून, तिच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कला क्षेत्रात भविष्यातही अशीच उत्तुंग यशाची शिखरे सर करून पाचोरा शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव अधिकाधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा तिच्यावर होत आहेत.कला छंद आर्ट क्लास परिवार, पालक, गुरुजन आणि नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



