पाचोर्यात आज २४ कोटींच्या विकास कामांचे भुमिपुजन आमदार किशोर पाटील यांच्या शुभास्ते होणार भुमी पुजनक्रीडा संकुलनामुळे खेळाडुंची प्रतिक्षा संपली.
पाचोरा — आज शहरा लगत असलेल्या काकणबर्डी येथिल खंडेराव महाराज मंदिराचा परिसर विकसीत करणे, तालुक्यातिल खेळाडुंसाठी क्रिडा संकुल व तालुका कृषी भवन ईमारतीचे भुमिपुजन समारंभ असे सुमारे २३ कोटी रूपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन आमदार किशोर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तालुक्यातिल शेतकर्यांसाठी गिरड रोडवरील कृषी विभागाच्या कार्यालय परीसरात जिल्ह्यातिल पहिले सुमारे १३ कोटी ९० लक्ष रूपयांचे अत्याधुनिक कृषीभवन उभारण्यात येणार आहे.पर्यटन क्षेञा अंतर्गत शहरालगत काकणबर्डी येथिल खंडेराव महाराज मंदिराचा परिसर ५ कोटी रूपयाच्या निधीतुन विकसीत करण्यात येणार आहे.सोबतच तालुक्यातिल खेळाडुंचे स्वप्न साकार करण्यासाठी ५ कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक क्रिडा संकुलनाचे विकास काम करण्यात येणार आहे.या सर्व विकास कामांचे भुमिपुजन आमदार किशोर पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या भुमिपुजन कार्यक्रमास प्रांताधिकारी भुषण अहिरे, विभागिय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,तहसिलदार विजय बनसोडे,नवनाथ सोनवणे,रविंद्र नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,बाजार समीती सभापती गणेश पाटील,गटविकास अधिकारी गोकुळ बोरसे,मुख्याधिकारी मंगेश देवरे,भडगाव शेतकरी संघ चेअरमन भैय्यासाहेब पाटील,विकास पाटील,राजेंद्र पाटील,प्रकाश पाटील,सुनिल पाटील,संजय पाटील,प्रदिप देसले,पदमसिंग पाटील,डाॅ.भरत पाटील,युवराज पाटील,संजय गोहिल,नरेंद्र पाटील,पंढरी पाटील,डाॅ.विशाल पाटील,किशोर बारवकर,जितेंद्र जैन,वसंत पाटील,रमेश पाटील,राहुल पाटील,प्रकाश तांबे,मनोज सिसोदिया,लखिचंद पाटील,युसफ पटेल,विशाल पाटील,राजेंद्र परदेशी,ज्ञानेश्वर सोनार,भोला पाटील,सुमित सावंत,समाधान पाटील,सुधाकर पाटील,जगदिश पाटील, रमेश जाधव,दिपक पाटील,गणेश भगुरे व जगदिश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास पाचोरा शहर व तालुक्यातिल शेतकरी, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थीत रहावे असे अवाहन बालाजी कन्स्ट्रक्शन परिवारातर्फे करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377