पाचोरा येथील संघवी उद्योग समूहाचे प्रतिष्ठित व्यापारी आनंद संघवी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पाचोरा – विधानसभा 2024ची निवडणूक चांगली रंगतदार होणार असून रोज नवनवीन घटनाक्रम पहावयास मिळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रमाणे हालचाली होत आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तर तिसऱ्या आघाडीची चाचपणी अशी सध्या राजकीय परिस्थिती निर्माण झालेली असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजून बरेच स्थित्यांतरे बघावयास मिळणार आहे. तसेच विधानसभा क्षेत्रातही संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षांतरे, कार्यकर्ते जुळवणी, पक्ष संघटन आदी गोष्टी फार वेगाने घडताना दिसत आहे
नुकत्याच पाचोरा येथील पार पडलेल्या शिवसेना आ. किशोर पाटील यांच्या निर्धार मेळाव्याप्रसंगी पाचोरा येथील संघवी उद्योग समूहातील प्रतिष्ठित ,नावाजलेले व राजकारणाची जाण असलेले शिवाय त्यांच्या शब्दाला मान मिळणारे असे व्यापारी श्री आनंद संघवी यांनी शिंदे शिवसेना गटात मेळाव्याप्रसंगी प्रवेश करत आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्यासाठी व पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेऊन येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये पक्षातील ध्येयधोरणे तसेच निवडणुकीच्या संदर्भातील कामकाजांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्य करणार असल्याचे दिसत आहे प्रवेश घेऊन त्यांनी आपली समाजसेवेची इच्छा पूर्ण करणार असल्याचा मानस दाखविला आहे.
.
आनंद संघवी यांचा मित्रपरिवार मोठा असून त्यांच्या येण्यामुळे नक्कीच मदत होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. धडाडीचे कार्यकर्ते व कार्यक्षम नेतृत्व असल्याचे याआधीही त्यांनी दाखवून दिलेले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुक वेळी त्यांची शिवसेनेला चांगली मदत मिळू शकते यात काही शंका नाही. मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील व आनंद संघवी यांचे स्नेहाचे संबंध असून कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातही त्यांचे मोलाचे सहकार्य लाभेल यातही काही दुमत नाही. त्यांच्या पक्ष प्रवेशाने त्यांच्यासोबत असलेला मित्रपरिवारही सुखावलेला दिसतोय.
माननीय गुलाबराव पाटील मंत्री महोदय यांच्या हातून प्रवेश घेत आमदार किशोर आप्पांवर विश्वास दाखवत ते आता पुढील कार्यकाळात पक्षासाठी काम करतील सदर पक्षप्रवेशाने त्यांच्याकडून अनमोल सहकार्य पक्षास सदैव प्राप्त होईल यात काही शंकेस वाव नाही.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



