महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक पाचोरा येथे संपन्न
पाचोरा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक पाचोरा येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे आयोजन पाचोरा येथे करण्यात आले होते जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व विधानसभेच्या निमित्ताने कामाला लागण्याचे आदेश दिले तसेच नुकतेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले तसेच इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला व नगरदेवळा आणि तांदुळवाडी येथील काही तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला
त्यावेळी जिल्हा सचिव शुभम पाटील उपजिल्हा अध्यक्ष प्रज्वल चव्हाण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे भडगांव तालुका अध्यक्ष सागर पाटील पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई भडगांव शहराध्यक्ष सुनील पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377