पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना
पाचोरा – कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सर्व जाती – धर्मीय मिळून एकत्रीत असलेला परिवार यामध्ये पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असो , पाचोरा मार्केट यार्ड आडत असो , हमाल-मापाडी पुरुष व महिला कामगार संघटनासह कृषी उत्पन्न बाजार समीती कर्मचारी वृंद वर्षभर धर्मीक व समाज हिताचे उपक्रम राबविण्यात एकजुटीने सक्रीय असतात अशा उपक्रमांसाठी पाचोरा कृ उ बा सामीतीचे सभापती – उपसभापतीसह सर्व संचालक मंडळ प्रोत्साहन देण्यास सक्रीय असतात
असा उपक्रम यावर्षा पासुन गणेशोत्सोव प्रारंभ करण्याची कल्पना सुचली आणि याचे अध्यक्षस्थान व्यापारी असो अध्यक्ष सचिन येवले यांना देण्यात आले त्यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपरोक्त सर्व असो व संघटना यांना विश्वासात घेऊन गणेशोत्सोव उत्साहाने साजरा करण्याचे निश्चित करून सदरची कल्पना पाचोरा कृ उ बा समीतीचे सभापती उप सभापती , सचिव तथा संचालक मंडळ यांच्या समोर मांडताच सर्वांनी एकमताने होकार देत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासीत केल्या नंतर आज गणेशाची प्रतिष्ठापना सभापती गणेश पाटील व त्यांच्या सौ भाग्यश्री गणेश पाटील ( मा नगरसेवीका ) यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ३.३० वाजता श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.
पाचोरा-भडगाव बाजार समितीतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी सोबत बाजार समितीशी संलग्न असलेले शेतकरी व्यापारी मजुर कामगारांसह सर्व घटक सुजलाम सुफलाम व्हावे सोबत सर्व विकास कामे निर्विघ्न व चांगली व्हावी यासाठी सभापती श्री गणेश पाटील यांनी गणरायाकडे प्रार्थना केली.
या वेळी संचालक मनोजशेठ सिसोदिया,सचिव बी बी बोरुडे साहेब,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सचिन येवले युवा उद्योजक प्रतिक शेठ मोर,योगेश शेठ संघवी,अविनाश गौड,जेष्ठ व्यापारी प्रकाश शेठ पटवारी, सुकदेव पाटील चंद्रकांत कोठावदे यांच्या सह विविध जाती – धर्मीय नागरीक पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असो , पाचोरा मार्केट यार्ड आडत असो , हमाल-मापाडी पुरुष व महिला कामगार संघटनासह कृषी उत्पन्न बाजार समीती कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377