पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत तूतारी वाजणार ?
पाचोरा दिनांक १४ – महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांचे उमेदवार चाचपणी सुरू आहे आज रोजी जरी तिकीट वाटपाचे फिक्स झालेले नसले तरी येणारा काळात फॉर्मुला ठरवून त्या प्रमाणात तिकीट वाटले जातील परंतु तिकीट वाटपाचा फॉर्मुल्याची वाट न बघता काही पक्षांनी किंबहुना काही भावी उमेदवारांनी आपल्या मतदार संघात प्रचार देखील सुरू केलेला आहे परंतु येणारे इलेक्शन हे न भूतो न भविष्य अशा प्रकारे झालेल्या निवडणुकांपैकी असेल येथे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतील शिवाय निवडणुकांमध्ये वाद विवाद भांडणे तंटे किंबहुना त्यापलीकडचे वाद टोकाला जाऊन विपरीत घटनाही घडल्यास आश्चर्य वाटायला नको.मागील काळातील पक्ष फुटी बाबत अथवा तोडफोडी बाबत नागरिकांन मध्येही प्रचंड रोष आहे हे ही विसरता कामा नये.
पाचोरा भडगाव विधानसभेसाठी देखील म.वी.का मधून तसेच महायुतीमधून जो तो आपल्या पदरात तिकीट पाडून घेण्यासाठी धडपड करीत आहे असे असताना या मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाच्या वैशालीताई सूर्यवंशी या मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार आहे तसेच तिकीटही फायनल झाले आहे अशा स्वरूपात त्यांनी तयारी देखील सुरू केलेले आहे तर राष्ट्रीय काँग्रेस कडून सचिन सोमवंशी यांनी देखिल प्रयत्न सुरू केलेले आहे.परंतु दिनांक 14 ऑगस्ट रोजी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी मा.शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांची मुंबई येथे व मागील पंधरवड्यात छ.संभाजी नगर येथे भेट घेऊन आपणही तिकिटासाठी इच्छुक असल्याचे दाखवून देत भेटी गाठी घेत आहे. मा.शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्या भेटीसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते गेले असता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांची तिकिटा बाबत सविस्तर चर्चा होऊन सदर बाबत विचार केला जाऊ शकतो असे संकेत मिळताना दिसत आहे.
माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा राजकारणातील गाढा अभ्यास ,संघटनेवर असलेली पकड ,कार्यशैली याचा विचार करता शरदचंद्र पवार गटातर्फे तुतारी चिन्हावर जर निवडणूक लढवली गेली तर मतदार संघातील चित्र बदलू शकते त्यामुळे कार्यकर्ते देखील उत्साहाने याबाबत प्रयत्नशील आहेत बैठकीदरम्यान पक्षातील पदाधिकाऱ्यांशी माननीय पवार साहेबांनी चर्चा करून तिकिटा बाबत आशावाद निर्माण केला आहे त्यामुळे आता मतदारसंघा मध्ये तुतारी वाजणार अशी चर्चा होऊ लागली आहे,शिवाय वाघ घराण्याचे मागील सत्तर वर्षाचे राजकारण पाहता त्यांचा मतदार हा बऱ्याच अंशी फिक्स असल्याचे अनेक अभ्यासक बोलत असतात , संभाव्य उमेदवारांची संख्या बघता निवडून येण्याचे गणित सोपे राहू शकते फिक्स असलेला मतदार ,सामाजिक गणिते ,जरांगे फॅक्टर तसेच दिलीपभाऊ यांच्या मागे दलित व मुस्लिम समाज बऱ्यापैकी असल्याने त्यांना तिकीट मिळाल्यास याचा फायदा नक्कीच होऊ शकतो तरी भविष्यात जागा वाटपामध्ये तिकीट कोणाला मिळेल हे बघणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.पण तुर्तास मतदासंघांतून तुतारी वाजणार ही खमंग चर्चा सुरू झाली आहे.
माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीदरम्यान माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी खलील दादा देशमुख ,नितीन तावडे ,विकास पाटील ,रणजीत पाटील, विनोद पाटील, अझरभाई खान,व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377