पाचोरा : येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेला शैक्षणिक साधने भेट देण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांच्या हस्ते शाळेला २ ग्रीन बोर्ड , २ सिलिंग फॅन आणि 1000 रुपयाचे लेखन साहित्य भेट देण्यात आले.
काल दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4 वाजता प्राथमिक विद्यामंदिर कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी सौ गिनी खुराणा, उपप्रांतपाल अभिजीत भंडारकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन रो. शरद मराठे, व रो. प्रा. गौरव चौधरी, ज्येष्ठ सदस्य रो.चंद्रकांतजी लोढाया, रो. राहुल काटकर माजी सेक्रेटरी डॉ.मुकेश तेली, डॉ. बाळकृष्ण पाटील, रो. निलेश कोटेचा, डॉ. तौसीफ खाटीक, डॉ. राजश्री पाटील, रोटरी क्लब अमळनेर चे अध्यक्ष तहा बुकवाला, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप भावसार, स्थानिक मुख्याध्यापक पंडित कुंभार उपस्थित होते.
पाचोरा शहरातील जुन्या नागरी वसाहतीत असलेल्या कोंडवाडा गल्ली भागातील प्राथमिक विद्या मंदिरातील शैक्षणिक अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपयुक्त साहित्य दिल्याच्या भावना अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी व्यक्त केल्या. योग्य ठिकाणी योग्य मदत दिल्याबद्दल प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराना यांनी पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे कौतुक केले. उपप्रांतपाल अभिजीत भंडारकर यांनी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य साठी रोख एक हजार रुपयांची देणगी दिली.
रोटरी सेक्रेटरी रो. डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उज्वला महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदीप पाटील, अभिजीत लांडगे, कल्पना पाटील, मनीषा चव्हाण, अर्चना मेश्राम, धनराज धनगर, हेमराज पाटील, आदींनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377