पाचोरा बंद मागे मात्र महाविकास आघाडीचे :काळ्या फिती लावून आंदोलन
पाचोरा – बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद च्या हाकेत पाचोरा बंद ची हाक महा विकास आघाडीने दिली होती मात्र दि. २४ चा बंद मागे घेण्यात आला आहे
महाविकास आघाडीने बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता मात्र उच्च न्यायालयात याचिका दाखल होता राजकीय पक्षांना बंद पुकरतायेत नाही हा न्याय बघता न्यायालयाचा मान राखत महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. पाचोरा बंद ची हाक देण्यात आली होती तसे निवेदन पाचोरा पोलीसांना देण्यात आले होते मात्र महाविकास आघाडीचे वरीष्ठांचे निर्देशानुसार दि २४ चा बंद मागे घेण्यात आला असल्याचे निवेदन पो. नि. अशोक पवार यांना देण्यात आले यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष अझर खान, शिवसेना उबाठा शहर प्रमुख अनिल सांवत, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, हरुण पटेल, उबाठा युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, हरीश देवरे कॉग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, आदी उपस्थित होते.
बदलापुर घटनेच्या निषेधार्थ आज दि २४ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते काळ्या फिती लावून सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहेत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उबाठा च्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, कॉग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377